आपण बोलत आहोत अभिनेत्री छाया कदम हिच्याविषयी. अभिनेत्री छाया कदम सध्या तिच्या कोकणातील गावी आहे. गावच्या सगळ्या गोष्टींचा ती आनंद घेत आहे. काही दिवसांआधी तिनं घरी तिच्या वहिनीने तयार केलेल्या शिरवळ्यांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता संपूर्ण कुटुंबाला घेऊन छाया कदम सहलीला निघाल्या आहेत.
( Marathi Serial : नव्या मालिकांच्या शर्यतीत 10 वर्षे जुन्या High TRP मालिकेची Re-entry! कोणती आहे ती? )
advertisement
छाया कदम यांनी त्यांच्या कुटुंबातील आणि वाडीतील सगळ्या स्त्रियांना घेऊन एक ट्रिप काढली. गाडी, बस न करता सगळ्या टेम्पोमधून ट्रिपला निघाल्या. छाया कदम टेम्पोमधल्या ट्रिपमध्ये रमून गेल्या. खूप आनंदानं त्या ट्रिप एन्जॉय करताना दिसल्या. सहलीला जायचा जायचा सहलीला म्हणत टेम्पोमध्ये धम्माल करत सगळ्या सहलीला निघाल्या.
छाया कदम यांनी सगळ्यांबरोबर समुद्रकिनारी धम्माल केली. "एक दिवस आमचो.. कुद कुद कुदाचो..खरो धिंगाणो तर नंतर हा", असं म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे. छाया कदम यांचा हा साधेपणा पाहून चाहते प्रेमात पडले. कमेंट करत त्यांचं कौतुक केलं.
एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलंय, "एवढी मोठी star असून पाय जमिनीवर आहेत." दुसऱ्यानं लिहिलंय, "कित्ती गोड ताई.. इतक्या international जगभर प्रसिद्धी आणि ओळख निर्माण करून देखील अगदी सामान्य आयुष्य जगताना आणि इतर लोकांना आनंद देताना पाहून आम्हाला अभिमान वाटतो."
छाया कदम यांनी मराठी तसंच हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली. 'सैराट', 'फ्रँड्री', 'झुंड' सारख्या सिनेमांतून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. 'लापला लेडीज', 'सिस्टर मिटनाइड', 'मडगाव एक्सप्रेस' सारख्या हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये त्यांनी काम केलं आहे. फिल्म फेअर सारखे अनेक अवॉर्ड्स त्यांना मिळाले आहेत. फक्त मराठी आणि हिंदी नाही तर त्यांनी मल्याळम सिनेमातही काम केलं आहे.
