भारतातील या शहरात आहे रहमान डकैतचे घर
चित्रपटाची कथा जरी पाकिस्तानमध्ये घडत असल्याचे दाखवण्यात आली असली, तरी त्याचे बहुतांश शूटिंग पंजाब आणि चंदीगडमध्ये झाले आहे. विशेष म्हणजे, रहमान डकैतचे हवेलीसारखे घर अमृतसरमधील ऐतिहासिक लाल कोठी आहे, जिथे चित्रपटाच्या टीमने दोन दिवस शूटिंग केले होते. याशिवाय, चित्रपटातील काही महत्त्वाचे सीन अमृतसर बस स्टँड, लुधियानातील खेडा गाव आणि सुखना लेक येथे शूट करण्यात आले आहेत. मात्र, या लोकेशन्सचा वापर इतक्या सफाईने करण्यात आला आहे की प्रेक्षकही गोंधळून गेले की आदित्य धरने खरंच पाकिस्तानमध्ये जाऊन शूटिंग करण्याची परवानगी घेतली होती का?
advertisement
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक लाल कोठीची तपासणी करताना दिसतात. त्याचवेळी, एक व्यक्ती ‘धुरंधर’मधील हवेलीशी संबंधित काही सीनचे फोटो हातात घेऊन, चित्रपटात दाखवलेल्या प्रत्येक भागाशी ते जुळवून पाहत आहे. मग ते रहमान डकैतचे दरवाज्यात बसलेले दृश्य असो, किंवा बाल्कनीतून लोकांना हात दाखवतानाचा सीन.
'धुरंधर’मध्ये रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, सौम्या टंडन, सारा अर्जुन, आर. माधवन, गौरव गेरा आणि राकेश बेदी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या फिल्मने दणदणीत कमाई केली आहे.
