आलिया भट्ट का गायब?
राज कपूर यांची मुलगी आणि ऋषी व रणधीर कपूर यांची बहीण रीमा जैन यांचा मुलगा अरमान हा करिश्मा, करीना आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ आहे. 'डायनिंग विथ कपूर्स' या शोमधील आलियाच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना अरमान म्हणाला,"आलियाकडे आधीपासून शूटिंगच्या काही कमिटमेंट्स होत्या. हे खूप फिल्मी वाटेल. पण राज कपूर साहेब म्हणायचे की,"काम ही पूजा आहे".
advertisement
दिग्दर्शकाने सांगितली कपूर कुटुंबियांची खासियत
‘डायनिंग विथ द कपूर्स’ची कल्पना अरमानचीच होती. आता नेटफ्लिक्सवर हा शो प्रसारित केला जाणार आहे. या शोच्या दिग्दर्शनाची धुरा स्मृती मुंद्रा यांनी सांभाळली आहे. स्मृती मुंद्रा यांनी याआधी नेटफ्लिक्सच्या 'द रोमँटिक्स'वर काम केलं आहे. बॉलिवूड हंगामा सोबत बोलताना स्मृती मुद्रा म्हणाल्या,"कपूर कुटुंबाची खासियत म्हणजे हे सगळे वर्कहोलिक आहेत आणि आपल्या कामावर मनापासून प्रेम करतात. सगळ्यांचा प्रयत्न असतो की शक्य तितके एकत्र यावे, पण कधी कधी एक-दोन जण कामामुळे येऊ शकत नाहीत आणि कुटुंबात हे पूर्णपणे समजून घेतलं जातं.”
भारतीय सिनेमाची परंपरा
कपूर कुटुंबाला भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि यशस्वी फिल्म परिवारांपैकी एक मानले जाते. पृथ्वीराज कपूर यांनी याची पायाभरणी केली होती. 1930–40 च्या दशकात भारतीय सिनेमातील सुरुवातीच्या सुपरस्टार्सपैकी पृथ्वीराज कपूर एक होते. त्यांची तीनही मुलं राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर हे फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार ठरले. पुढील पिढीत राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनीही चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. आता ही परंपरा रणबीर, करिश्मा, करीना आणि पुढील पिढीकडून पुढे नेली जात आहे. ‘डायनिंग विथ द कपूर्स’चा प्रीमियर नेटफ्लिक्सवर 21 नोव्हेंबरला होणार आहे.
