मिळालेल्या माहितीनुसार, अखिल विश्वनाथ या अभिनेत्याने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. अभिनेत्याची आई गीता या ऑफिसला जात असताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. राहत्या घरात अखिल आईला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
अखिल विश्वनाथ हा एक लोकप्रिय अभिनेता होता. त्याला 'मांगंडी' या टेलिफिल्ममधील कामासाठी राज्य सरकारचा बालकलाकार हा पुरस्कारदेखील मिळाला होता. तसेच सनल कुमार शशीधरण यांच्या 'चोला' या चित्रपटाच्या माध्यमातून अखिल विश्वनाथला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. 'ऑपरेन जावा' या चित्रपटातही अखिलच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. त्याच्या अनेक चित्रपटांचं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झालं आहे.
advertisement
अखिल विश्वनाथ एक अभिनेता म्हणून काम करण्यासह एका मोबाईलच्या दुकानात मॅकेनिक म्हणूनही काम करत होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्याने या दुकानात जाणं बंद केलं होतं. अखिलच्या वडिलांचा तीन महिन्यांपूर्वीच अपघात झाला होता. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखिलवर सध्या कुटुंबाचा आर्थिक खर्च आणि वडिलांचे उपचार करण्याचा ताण होता. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. पण पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू असून ते आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
