मात्र, IPS अधिकारी रामचंद्र राव यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत, आपली बदनामी करण्यासाठी कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये IPS अधिकारी सरकारी चेंबरमध्ये अधिकृत गणवेशात बसलेले असून ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्ये करत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या घटनेमुळे केवळ पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली नाही, तर मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
advertisement
गणवेशात रोमान्स करताना दिसले अधिकारी
IPS अधिकाऱ्याच्या या व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. अहवालांनुसार हा व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये IPS अधिकारी रामचंद्र राव कामाच्या वेळेत वेगवेगळ्या महिलांसोबत लिपलॉक करताना आणि मिठी मारताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व ते ऑफिसमध्ये अधिकृत गणवेशात असताना घडत असल्याचे सांगितले जात आहे. अधिकारी एकामागून एक वेगवेगळ्या महिलांना भेटताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
(व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा)
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून नाराजी व्यक्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPS अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देण्यात आली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी संबंधित विभागांकडून अहवाल मागवला आहे. पोलीस खात्यात इतक्या उच्च पदावर असलेली व्यक्ती असे कसे वागू शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
