जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहाना आई बनली आहे. तिने तिसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. 13 सप्टेंबर 2025 रोजी रिहाना आई बनली असून, तिने गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतेच आपल्या मुलीचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. छोट्या बाळाने गुलाबी रंगाचा पोशाख घातलेला दिसतो. फोटोसोबतच रिहानाने गोंडस मिटन्सचा फोटोही पोस्ट केला आहे.
advertisement
47 व्या वर्षीही अविवाहित आहे अभिनेत्री, पुरुषांचं अटेंशन मिळालं, पण लग्न का केलं नाही?
रिहानाने मुलीचं नाव Rocki ठेवलं आहे. यामुळे रिहाना आणि रॉकी आता तीन मुलांचे पालक झाले आहेत. दोघांचे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या मुलांचे वय जवळजवळ सारखे असावे असे वाटते, जेणेकरून ते एकत्र वाढतील आणि घट्ट नाते निर्माण करतील.
2020 पासून एकत्र असलेले रिहाना आणि रॉकी यांनी 2022 मध्ये पहिल्या मुलाचे स्वागत केले. या मुलाचे नाव RZA ठेवण्यात आले. त्यानंतर 2023 मध्ये दुसऱ्या बाळाचा जन्म झाला, ज्याचे नाव Riot आहे. आता तिसऱ्या मुलीचे नाव Rocki ठेवेलं आहे. रिहाना आणि रॉकीवर मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सोशल मीडियावर या लहानग्याच्या फोटोंना प्रचंड प्रेम मिळत आहे.