हा खुलासा फराह खानने काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये केला, ज्यात अनन्या पांडे देखील तिच्यासोबत खास पाहुणी म्हणून उपस्थित होती.
फराह खानने तिच्या जुन्या प्रेमाबद्दल बोलताना हा खास किस्सा सांगितला. ज्या व्यक्तीवर तिचे प्रेम होते आणि ज्याच्यासोबत तिला लग्न करायचे होते, तो व्यक्ती तिचे पती शिरीष कुंदर नव्हते. फराह खान म्हणाली, "एकदा मला ज्याच्यावर प्रेम आहे असे वाटत होते, त्या व्यक्तीसोबत लग्न व्हावे यासाठी मी अनवाणी हाजी अली दर्ग्यावर गेली होते. पण बरं झालं, हाजी अलीने माझी प्रार्थना ऐकली नाही!"
advertisement
कोण होता फराह खानचा पहिला क्रश?
फराह खानने या कार्यक्रमात फक्त जुन्या प्रेमाबद्दलच नाही, तर तिच्या 'क्रश'बद्दलही खुलासा केला. फराह खान जेव्हा तरूण होती, तेव्हा तिला अभिनेता चंकी पांडे यांच्यावर क्रश होता. हे ऐकून खुद्द चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेलाही धक्का बसला. फराहने यापूर्वीही एका टीव्ही शोच्या सेटवर ही गोष्ट बोलून दाखवली होती.
उशिरा लग्न, पण सुखी संसार
ज्या व्यक्तीसाठी फराह खान अनवाणी दर्ग्यावर गेली होती, ती व्यक्ती तिला मिळाली नाही. पण नियतीने तिच्यासाठी वेगळा प्लॅन करून ठेवला होता. 'मै हूँ ना' या चित्रपटाच्या सेटवर तिला तिच्या आयुष्यभराचे साथीदार शिरीष कुंदर भेटले.
फराह खानने वयाच्या ३९ व्या वर्षी, ९ डिसेंबर २००४ रोजी शिरीष कुंदरशी लग्न केले. शिरीष कुंदर तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान आहे. आज या दोघांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन गोंडस मुले आहेत. उशिरा लग्न झाले असले तरी फराह खान आज शिरीष कुंदरसोबत खूप आनंदी आणि सुखी संसार करत आहे.
