TRENDING:

काही महिन्यांवर सिनेमाचं रिलीज, त्याआधी 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा मोठा निर्णय, म्हणाला 'ऑफिशिअल...'

Last Updated:

Kiran Gaikwad Shocking Decision : 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड याच्या इन्स्टाग्रामवर पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड याने अचानक इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स नियमितपणे शेअर करणाऱ्या किरणने चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 'देवमाणूस'च्या दोन यशस्वी पर्वांनंतर आणि 'देवमाणूस: मधला अध्याय' मधून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्याने इतका मोठा निर्णय का घेतला, याबद्दल चाहत्यांच्या मनातील गोंधळ वाढली आहे.
News18
News18
advertisement

वेळेचं गणित बिघडलं, म्हणून रजा घेतोय!

किरण गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, त्यासोबत एक कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टमध्ये त्याने सोशल मीडियापासून दूर जात असल्याचे सांगितले. त्याने असे करण्याचा निर्णय का घेतला याबाबत स्पष्ट कारण दिले आहे. किरणने पोस्टमध्ये म्हटलंय, "सोशल मीडिया चांगली आहे पण योग्य वेळ वापरता आली तर. माझा खूप वेळ सोशल मीडियावर जातोय, असं लक्षात आलं. म्हणून जरा काही काळासाठी (कायमचा नाही) माझ्या ऑफिशियल हँडल्स वरून रजा घेतोय... भेटूया लवकरच. खूप खूप प्रेम."

advertisement

'असा नवरा पुन्हा नको...', गोविंदाबद्दल पुन्हा बरळली सुनीता आहुजा, वैतागून केला शॉकिंग खुलासा, म्हणाली...

या पोस्टसोबत त्याने #socialmediadetox हा हॅशटॅगही वापरला आहे, ज्यामुळे तो खरोखरच सोशल मीडियाच्या व्यसनापासून ब्रेक घेत असल्याचे दिसत आहे.

ब्रेक घेण्यामागे सिनेमाचे कारण?

advertisement

किरण गायकवाडने अचानक ब्रेक घेण्याच्या या निर्णयाने चाहते नाराज असले, तरी अनेक चाहत्यांनी यामागे त्याचे आगामी व्यावसायिक काम असण्याची शक्यता वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत किरण गायकवाडने आपल्या दिग्दर्शन आणि लेखनाच्या पदार्पणाबद्दल सांगितले होते. किरण म्हणाला होता, "आता निगेटिव्ह खूप झालं आहे, त्यामुळे म्हटलं आता थांबूयात आपण. मी स्वतःचा सिनेमासुद्धा लिहिला आणि त्याचं दिग्दर्शनसुद्धा झालंय. 'FIR No 469' नावाचा सिनेमा मी दिग्दर्शित केला आहे. माझी जी काही तळमळ, खदखद आहे, ती आता मी लेखणीतून कागदावर उतरवली आहे. पुढच्या वर्षी त्या सिनेमाची घोषणा करेन."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

किरणने सोशल मीडियापासून दूर राहून त्याच्या आगामी सिनेमाच्या पोस्ट-प्रोडक्शनवर किंवा प्रमोशनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा ब्रेक घेतला असावा, असा अंदाज लावला जात आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये त्याला लवकर परत येण्याची विनंती केली आहे, तर काहींना ही केवळ त्याची गंमत वाटत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
काही महिन्यांवर सिनेमाचं रिलीज, त्याआधी 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा मोठा निर्णय, म्हणाला 'ऑफिशिअल...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल