दहीहंडी सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "मुंबईकर.... इथे लईच राडा आहे. मुंबईकरांचा नादच करायचा नाही. मुंबईतील दहीहंडी जोरात असते. तुम्हीच मला संधी दिली. या स्टेजपासून माझ्या मुंबईच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रकाश दादांनी संधी दिली. म्हणून मी तुमचे आभार मानते. हे माझं तिसरं वर्ष आहे. माझ्यासोबत तुम्ही पण राडा घालायचा आहे." तिच्या या उत्साहपूर्ण बोलण्याने प्रेक्षकांमध्ये जोश संचारला.
advertisement
( ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुमsss लक्ष्याचं गाणं आजही इतकं लोकप्रिय का? गिरगावशी खास नातं )
कोळी गाण्यांवर थिरकली
गौतमीने 'साताऱ्याची गुलछडी', 'मालवण पाण्यामध्ये किल्ला', 'दऱ्याकिनारी एक बंगलो पोरी', 'मेरा दादला', 'मला लगीन करावं पाहिजे' या गाण्यांवर तुफान डान्स केला. तिच्या या कातिल अदांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. "मला कोळी लोक खूप आवडतात. ते नेहमी मला खूप प्रेम देतात.यावेळी काहीतरी वेगळं करायचं ठरलं होतं. म्हणून मी कोळी गाण्यांवर डान्स करायचं ठरवलं", असं गौतमीनं सांगितलं. गोविंदा पथकांनी तिला उत्साहाने तिला साथ दिली. गौतमीनं शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय जय श्रीरामच्या घोषणांही दिल्या.
ब्लाऊज डिझाइनने वेधलं लक्ष
गौतमीच्या नऊवारी साडी आणि खास ब्लाऊजने सर्वांचं लक्ष वेधलं. तिच्या ब्लाऊजवर दोन मोर आणि राधा-कृष्णाचं सुंदर डिझाइन होतं. तिच्या या अनोख्या स्टाईलने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक करायला भाग पाडलं. गौतमीचा हा लूक आणि तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गौतमीचा प्रवास
गौतमी पाटील आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध डान्सर आहे. तिचा प्रवास मागाठाणे दहीहंडीपासूनच खऱ्या अर्थाने सुरू झाला. मागील वर्षी तिच्या एका व्हायरल डान्समुळे ती वादातही सापडली होती. पण तिने माफी मागून आपली चूक सुधारली. गौतमीच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होत असते. यंदाच्या दहीहंडी सोहळ्यातही तिने आपली जादू दाखवली.