ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुमsss लक्ष्याचं गाणं आजही इतकं लोकप्रिय का? गिरगावशी खास नातं

Last Updated:

Laxmikant Berde Govinda Re Gopala Songh : लक्ष्मीकांत बेर्डे यांचं दहीहंडीचं ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुमsss हे गाणं अजरामर झालं. हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्याचं मुंबईतील गिरगावशी खास नातं आहे.

News18
News18
मुंबई : अरेsss बोल बजरंग, बली की जय, ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुम sss हे गाणं कानावर पडल्याशिवाय दहीहंडी पूर्णच होऊ शकत नाही. 1989 साली रिलीज झालेल्या हमाल धमाल दे धमाल या या सिनेमातील हे गाणं आज 35 वर्षांनीही तितकंच लोकप्रिय आहे. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याला तोड नाही. त्यांच्या एनर्जेटीक डान्सनं या गाण्याला चार चांद लावलेत.  लक्ष्याचं हे गाणं आजही इतकं लोकप्रिय का आहे असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? या गाण्याचं मुंबईतील गिरगावशी खास कनेक्शन आहे.
वर्षा उसगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, जयवंत वाडकर, विजय पाटकर, सुधीर जोशी सारखी दमदार कास्ट असलेला हा एव्हरग्रीन सिनेमा आजही लोक आवडीनं पाहतात. सिनेमातील सगळीच गाणी खूप फेमस आहेत. त्यातील दहीहंडीचं ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुमsss हे गाणं अजरामर झालं. या गाण्यावरूनही अनेकदा हा सिनेमा ओळखला जातो. बोल बजरंग बली की जय... असं म्हणत हे गाणं प्रत्येक गोविंदाचा उत्साह वाढवतो.
advertisement
चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांच्या माहितीनुसार, हे गाणं फिल्मीस्तान स्टुडीओमध्ये शूट करण्यात आलं. स्टुडिओच्या शेजारी एक कायमस्वरूपी वस्ती होती तिथे या गाण्याचं शूटींग झालं.
हे गाणं हिट होण्यामागे गिरगावशी खास कनेक्शन आहे. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे यांचं संपूर्ण बालपण मुंबईतील गिरगावमध्ये गेलं. जन्मापासून लक्ष्मीकांत यांनी मध्यमवर्गीय आयुष्य पाहिलं होतं. गिरगावच्या चाळीत बालपण गेल्यामुळे गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, गोविंदा असे सगळे सण त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरे केले होते. चाळीत सणांमध्ये होणाऱ्या गंमती जंमती, ती मज्जा त्यांनी अनुभवली होती. गोविंदाचा उत्साह काय असतो हे सांगण्याची त्यांना गरज पडली नाही.
advertisement
लक्ष्मीकांत बेर्डे यांना या सगळ्याचा फायदा या गाण्यावेळी झाला. अनेक वर्ष गोविंदांबरोबर असल्यानं त्यांची एक वेगळी स्टाइल त्यांना माहिती होती. कोरिओग्राफरपेक्षा कलाकारांचाच उत्साह जास्त असायचा. गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नाचण्याची अनोखी स्टाइल सगळ्यांना आवडली.
advertisement
हे गाणं सुर्यकांत लवंदे यांनी शूट केलं होतं. तर गाण्याचं संगीत अनिल मोहिले यांनी दिलं होतं. या गाण्यामध्ये ड्रीम सिक्वेन्सही असल्यामुळे त्याचाही एक वेगळा प्रभाव प्रेक्षकांवर पडला. बोल बजरंग बली की जय... म्हणत सुरू होणारा ठेका प्रत्येकाला थिरकायला भाग पाडतो. त्यामुळेच हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आणि एव्हरग्रीन आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुमsss लक्ष्याचं गाणं आजही इतकं लोकप्रिय का? गिरगावशी खास नातं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement