Success Story: २ जोड कपडे, पडकं घर प्यायच्या पाण्यासाठी वणवण, पण एका जिद्दीने पालघरची अस्मिता झाली पोलीस; अश्रू आणणारी संघर्षाची कहाणी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मलवाडा पाड्यातील अस्मिता कैलास ठाकरेने जिजाऊ संस्थेच्या निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण होऊन आदिवासी मुलींना प्रेरणा दिली.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात, जिथे आजही पाण्याची भीषण टंचाई, शिक्षणासाठी फार संसाधनं नाही, परिस्थिती अत्यंत हालाकीची तिथे एका तरुणीने 'असंभव' वाटणारं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करून दाखवलं ते अस्मिता कैलास ठाकरे यांनी. ज्या आदिवासी पाड्यात बारावी झाली की एकतर शेतीत राबायचं किंवा लग्न करून नव्या आयुष्याला सामोरं जायचं इतकंच माहिती होतं.
advertisement
त्या 'मलवाडा' आदिवासी पाड्यातून अस्मिताने यशाची नवी पहाट आणली आहे. तिची ही कहाणी केवळ यशाची नाही, तर दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि आत्मविश्वासाची आहे. तिची ही कहाणी याच आदिवासी पाड्यातील अनेक मुलींसाठी नवीन प्रेरणा देणारी आहे. तिथल्या प्रत्येक कुटुंबासाठी आहे ज्यांनी मुलींची अवघ्या 18 व्या वर्षी लग्न करुन दिली. त्या प्रत्येकासाठी ही कहाणी प्रेरणादायी आहे, मुलीली कमी नाहीत त्यांनी ठरवलं तर सारं काही शक्य होऊ शकतं हे सांगणारी ही कहाणी आहे. - फोटो क्रेडिट - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था
advertisement
अस्मिताचं बालपण म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य आणि संघर्षाची गाथा. राहायला धड घर नाही, पिण्याच्या पाण्याची कायम टंचाई. मलवाडा पाड्यावर दोन वेळचं पाणी भरण्यासाठी तिला कुटुंबासोबत लांबचा पल्ला गाठावा लागत असे. घरातली सगळी कामं, शेतीत वडिलांना मदत, हे सगळं करून तिला शिक्षणासाठी वेळ काढावा लागत होता. फोटो क्रेडिट - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था
advertisement
अस्मिताचे वडील सांगतात, "बारावी शिकून आमच्या पोरींसाठी शेतीत रोजगार किंवा लग्न हेच पर्याय उपलब्ध आहेत." पण अस्मिताने वेगळं स्वप्न पाहिलं होतं सरकारी नोकरीचं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, अंगावर फक्त दोन जोड कपड्यांवर तिने १२ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. दिवसा काबाडकष्ट आणि रात्री 'पडक्या' घरात दिवा लावून तिने केलेले कष्ट आज कामी आले आहेत. फोटो क्रेडिट - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था
advertisement
अस्मिताचं स्वप्न खूप मोठं होतं, पण परिस्थिती तिला मागे ओढत होती. अशा वेळी तिला आणि तिच्या स्वप्नांना बळ दिले ते जिजाऊ शिक्षण संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी. निलेश सांबरे यांनी या आदिवासी पाड्यातील मुलांना नवी दिशा दिली. त्यांचे शब्द अस्मितासाठी प्रेरणास्रोत ठरले: "रडत बसू नका, लढायला शिका! शेती कामापेक्षा सरकारी नोकरीचं स्वप्न पाहा, माझ्या कुटुंबाचं आणि गावाचं नाव उज्ज्वल करा." या मार्गदर्शनामुळेच अस्मिताला पोलीस होण्याचा मार्ग सापडला. - फोटो क्रेडिट - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था
advertisement
advertisement
अखेरीस, ज्या क्षणाची तिने आणि तिच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे वाट पाहिली होती, तो क्षण आला. जेव्हा तिच्या पोलीस भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा आनंद आणि भूतकाळातील संघर्षाची आठवण यामुळे तिला भावना अनावर झाल्या. एका क्षणाला ती ढसाढसा रडू लागली. हे अश्रू केवळ यशाचे नव्हते, तर दारिद्र्याला आणि टंचाईला हरवल्याचे ते पुरावे होते.
advertisement
आज अस्मिता कैलास ठाकरे पोलीस भरतीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झाली आहे. 'जिथे पाणी नाही, रस्ते नाहीत' अशा मलवाडा पाड्यासाठी अस्मिता ठाकरे एक आशेचा किरण ठरली आहे. तिचे हे यश हे सिद्ध करते की, योग्य मार्गदर्शन, जिद्द आणि कठोर मेहनत असेल तर दारिद्र्याची भिंतही कोसळू शकते. तिच्यामुळे आता मलवाड पाड्यातील अनेक मुली सरकारी नोकरीचे स्वप्न पाहू लागल्या आहेत.


