Dharashiv Crime : देवदर्शन करुन आले, पत्नीचा फोन आल्याने प्रेयसी भडकली, वादातून अखेर विवाहित प्रियकरानं....

Last Updated:

Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

देवदर्शन करुन आले, पत्नीचा फोन आल्याने प्रेयसी भडकली, वादातून अखेर विवाहित प्रियकरानं....
देवदर्शन करुन आले, पत्नीचा फोन आल्याने प्रेयसी भडकली, वादातून अखेर विवाहित प्रियकरानं....
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित महिलेवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या केलेला तरुण हा विवाहित आहे.
मृत तरुणाचे नाव आश्रुबा अंकुश कांबळे (वय 39, रा. रुई ढोकी) असे असून, तो गेल्या पाच वर्षांपासून धाराशिवमधील साई कला केंद्रात नृत्यसंबंधित काम करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंधात असल्याची माहिती समोर आली आहे.

> देवदर्शनावरून परताना अन् वाद भडकला...

मंगळवारी आश्रुबा आणि महिला शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनावरून परतत असताना तरुणाच्या पत्नीचा फोन आला. या फोनवरुन दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात आश्रुबाने "आत्महत्या करतो" अशी धमकी दिली. मात्र, महिलेने त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर त्याने संतापाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं.
advertisement

> गळफास घेऊन आत्महत्या

वादानंतर आश्रुबा थेट चोराखळी परिसरात आला आणि झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिकांनी याची माहिती तात्काळ येरमाळा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, शवविच्छेदनासाठी पाठवले आणि नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

> महिला पोलिसांच्या ताब्यात....

या संपूर्ण घटनेत महिलेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. येरमाळा पोलिसांनी सांगितले की, IPC कलम 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Dharashiv Crime : देवदर्शन करुन आले, पत्नीचा फोन आल्याने प्रेयसी भडकली, वादातून अखेर विवाहित प्रियकरानं....
Next Article
advertisement
Pune News : साडे चार तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर आरोपांचा बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळबळ
४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब
  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

View All
advertisement