Winter Skin Care : हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय, घरीच बनवा मॉईश्चरायझर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हिवाळ्याच्या काळात त्वचेला मॉइश्चरायझ करणं खूप महत्वाचं आहे, त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर कोरडेपणामुळे त्वचेवर लहान जखमा देखील होऊ शकतात. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड गर, बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करुन घरी नैसर्गिक मॉइश्चरायझर बनवता येतं.
मुंबई : हिवाळ्याच्या थंड हवेत अनेकांची त्वचा कोरडी होते. काहींच्या त्वचेवर ओरखडेही उठतात. त्यामुळे, हिवाळ्यात आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. थंड हिवाळ्यातील हवेमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
हिवाळ्याच्या काळात त्वचेला मॉइश्चरायझ करणं खूप महत्वाचं आहे, त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर कोरडेपणामुळे त्वचेवर लहान जखमा देखील होऊ शकतात. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड गर, बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करुन घरी नैसर्गिक मॉइश्चरायझर बनवता येतं.
advertisement
एका भांड्यात कोरफडीचा गर घ्या. त्यात बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल घाला. या मिश्रणाचा रंग हलका पांढरा तयार होईपर्यंत सगळे घटक नीट मिसळा किंवा फेटून घ्या. हे क्रीम शरीराच्या कोणत्याही भागावर लावता येतं. या नैसर्गिक मॉइश्चरायझरमुळे थंड हवामानातही त्वचा मऊ, कोमल आणि हायड्रेटेड राहते.
कोरफड - कोरफड गरामुळे त्वचा मॉइश्चरायझ राहते आणि यामुळे त्वचेची आर्द्रता राखली जाते. सूर्यप्रकाश आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे. मुरुमं आणि मुरुमांमुळे येणारे डाग यामुळे कमी करता येतात. कोरफडीमुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत करणं शक्य होतं.
advertisement
बदाम तेल - बदाम तेल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. हे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करतं आणि कोरडेपणा कमी होतो. यातली जीवनसत्त्वं आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मऊ आणि चमकदार बनवतात. बदाम तेलात व्हिटॅमिन ई असतं. त्वचेच्या आरोग्यासाठी हा घटक आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 9:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Skin Care : हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय, घरीच बनवा मॉईश्चरायझर