डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' अ‍ॅपवर मिळतंय 100% कॅशबॅक 

Last Updated:

Cash Back Offer: डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारी पेमेंट अ‍ॅप भीमने पुन्हा एकदा यूझर्ससाठी एक उत्तम ऑफर लाँच केली आहे. त्यांच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त, अ‍ॅप एक मोठी कॅशबॅक ऑफर देतेय. ज्यामध्ये यूझर्सना ऑनलाइन पेमेंट आणि वीज बिल पेमेंटवर कॅशबॅक मिळतेय. विशेष म्हणजे, भीम अ‍ॅपद्वारे केलेले व्यवहार 100% पर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी देखील देतात.

 यूपीआय पेमेंट
यूपीआय पेमेंट
BHIM App Anniversary Offer: तुम्ही देखील ऑनलाइन पेमेंट करता आणि नेहमीच कॅशबॅक ऑफरच्या शोधात असता का? तसे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. डिजिटल पेमेंट यूझर्सना पैसे वाचवण्याची एक उत्तम संधी मिळत आहे. सरकारच्या पेमेंट अ‍ॅप भीमवर यूझर्ससाठी एक मोठी कॅशबॅक ऑफर लाँच झालीये. जी पूर्ण 100% कॅशबॅक देते. याचा अर्थ असा की तुम्ही या ऑफर अंतर्गत व्यवहार केला तर तुम्हाला 100% कॅशबॅक मिळेल. चला जाणून घेऊया ही ऑफर काय आहे आणि भीम अ‍ॅपद्वारे तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता.
सरकारी पेमेंट अ‍ॅप भीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केलीये. ज्यामध्ये यूझर्सना 100% कॅशबॅक मिळवण्याची संधी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, फक्त एकच अट आहे की तुम्ही किमान ₹20 चा व्यवहार केला पाहिजे. भीम अ‍ॅप त्याचा 9 वा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि या निमित्ताने ही खास कॅशबॅक ऑफर लाँच केली आहे. यूझर्सना या रोमांचक ऑफरची माहिती देण्यासाठी अ‍ॅपने X वर पोस्ट केले आहे.
advertisement
BHIM अ‍ॅपचा वर्धापन दिन 30 डिसेंबर रोजी आहे आणि म्हणूनच यूझर्सना ही खास ऑफर मिळत आहे. भीम अ‍ॅप 30 डिसेंबर 2016 रोजी लाँच करण्यात आले. तेव्हापासून, त्याच्या प्रवासामुळे देशात डिजिटल पेमेंट सोपे आणि विश्वासार्ह झाले आहे.
advertisement
वीज बिल पेमेंटवर कॅशबॅक
इतकेच नाही तर भीम अ‍ॅप बिल पेमेंटवर कॅशबॅक देखील देत आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, भीम अ‍ॅपवर चालणाऱ्या कॅशबॅक ऑफर अंतर्गत, वीज बिल भरणाऱ्या यूझर्सना अतिरिक्त बचत करण्याची संधी मिळत आहे. ही ऑफर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि दिल्ली सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या बीएसईएस राजधानी पॉवरने दिलीये. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, यूझर भीम अ‍ॅपद्वारे त्यांचे वीज बिल भरून इंस्टंट कॅशबॅक मिळवू शकतात. ही कॅशबॅक ऑफर या महिन्याच्या अखेरीस, 31 डिसेंबर 2025 पर्यंत वैध असेल. पेमेंट करताना, कॅशबॅक मिळवण्यासाठी चेकआउटवर बिलडेस्क ऑप्शन अवश्य निवडा.
advertisement
तुम्हाला किती कॅशबॅक मिळेल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूझर्स महिन्यातून एकदाच या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. कॅशबॅक मिळवण्यासाठी किमान ₹500 चे वीज बिल भरणे आवश्यक आहे. या ऑफर अंतर्गत, यूझर्सना जास्तीत जास्त ₹50 चा कॅशबॅक मिळू शकतो. जो थेट भीम अॅपशी लिंक केलेल्या त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जाईल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' अ‍ॅपवर मिळतंय 100% कॅशबॅक 
Next Article
advertisement
Pune News : साडे चार तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर आरोपांचा बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळबळ
४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब
  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

View All
advertisement