अभिजीत सावंतचा जन्म 7 ऑक्टोबर 1981 साली झाली. तो मुळचा मुंबईचा. अभिजीतला सुरूवातीपासूनच गाण्याची आवड होती. इंडियन आयडिअलपासून त्यानं सुरूवात केली. अभिजीतनं या कार्यक्रमात पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांनी अभिजीतला वोट देत त्याला पहिला इंडियन आयडिअल बनवलं,
हेही वाचा - 50 किलो वजन कमी केल्यानंतर अशी दिसतेय अभिनेत्री आरती सोळंकी; वेट लॉससाठी दररोज करायची 'या' गोष्टी
advertisement
इंडियन आयडिअल जिंकल्यानंतर अभिजीतचा पहिला म्युझिक अल्बम आला. 'आप का अभिजीत' असं त्या अल्बमचं नाव होतं. या अल्मबमधील ‘मोहब्बतें लुटाऊंगा मैं छेड़कर मन का साज…’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. या गाण्यानं प्रेक्षकांमध्ये अभिजीतची क्रेझ निर्माण झाली. त्यानंतर यशाच्या शिखरावर असलेल्या अभिजीतनं 'आशिक बनाया आपने’सिनेमातील ‘मरजावां’ हे गाणं गायलं.
बॉलिवूड स्पायला दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतनं त्याचं करिअर आणि इंडस्ट्रीचं सत्य सांगितलं होतं. सिनेमातील गाण्याची संधी न मिळण्यामागचं खरं कारण त्यानं सांगितलं होतं. तो म्हणाला, "आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. त्यांचा एक गट असतो अन् त्या गटामध्ये पोहोचणं बाहेरील गायकांसाठी खुप कठीण असतं. माझ्या बाबतीतही तेच घडलं".
अभिजीत पुढे म्हणाला, "इंडियन आयडल जिंकल्यावर माझा प्रवास सुरु झाला. गेल्या 15 वर्षांच्या काळात अनेकांनी मला रिजेक्ट केलं. कारण मी त्यांच्या गटातील गायक नव्हतो. रिअलिटी शोमधील कलाकार रातोरात प्रसिद्ध होतात, त्यांचा खुप मोठा फॅन फॉलोअर्स असतो. मात्र त्यांच्यासोबत काम करायला इंडस्ट्रीमधील कलाकार कंफर्टेबल नसतात. त्यामुळं त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नाही".