अलीकडेच मुंबईत हे दोघे एकत्र दिसले. हार्दिक त्याच्या आलिशान गाडीतून उतरला आणि काही क्षणांनी माहिका त्याच्याकडे चालत आली. ती त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करते, पण हार्दिक पटकन हात मागे घेतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आत नेतो. दोघांनी पापाराझींसाठी पोज देणं टाळलं, पण कॅमेऱ्यात सगळं कैद झालं आणि तिथूनच चर्चांना सुरुवात झाली.
advertisement
6 मुलांच्या वडिलांवर झालं प्रेम, विना लग्नाची अभिनेत्री बनली दोन मुलांची आई
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पहायला मिळाला. काहींनी लिहिलं, “हार्दिकची पसंती बदलते पण स्टाइल नाही” तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या, “दोघेही अगदी जुळे दिसतात.”
हार्दिकची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्मा 24 वर्षांची असून ती मॉडेल आहे. आणि ती योगा प्रशिक्षक आहे. तिने दिल्ली, गुजरात आणि अमेरिकेत शिक्षण घेतलं आहे. माहिका अनेक अॅड फिल्म्स आणि फॅशन शोमध्ये झळकली आहे, तसेच मनीष मल्होत्रा यांसारख्या टॉप डिझायनर्ससोबतही तिने काम केलं आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 41 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यात अर्जुन कपूरसारखे बॉलिवूड स्टार्सही आहेत.
हार्दिक आणि माहिकामध्ये तब्बल 7 वर्षांचं वयाचं अंतर आहे, पण त्यांची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणतात “प्रेमाला वयाचं बंधन नसतं!”