एएनआय वृत्तसंस्थेसोबत बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, "हा सन्मान केवळ देओल कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आनंदाचा क्षण आहे. यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे. जर हा पुरस्कार आणखीन लवकर मिळाला असता, तर धर्मेंद्र यांनाही आनंद झाला असता. तसंच त्यांचे अनेक चाहतेसुद्धा यामुळे खुश झाले असते." दरम्यान, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना भारत सरकारकडून कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
advertisement
बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावर दमदार अभिनय केला. धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' हा शेवटचा चित्रपट जानेवारी 2026 मध्ये प्रदर्शित झाला. धर्मेंद्र यांनी 'शोला और शबनम', 'अनपढ', 'शादी', 'बंदिनी', 'फुल और पत्थर', 'मेरा नाम जोकर'सारख्या चित्रपटांतून चाहत्यांचे खळखळून मनोरंजन केले. 'ड्रीम गर्ल', 'सीता और गीता', 'चुपके चुपके' या चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या.
