आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी आणि ते होळीचं गाणं म्हणजे 'भागी रे भागी ब्रिज बाला'. हेमा मालिनी यांनी इंडियन आयडल 15 मध्ये या गाण्याचा किस्सा सांगितला होता. हे गाणे धर्मेंद्र आणि राजेश खन्ना अभिनीत 1982 च्या 'राजपूत' सिनेमातील आहे. या गाण्यात धर्मेंद्र हेमा मालिनीच्या शेजारी व्हाइट आणि निळा ड्रेसमध्ये दिसत आहेत. हेमा मालिनी यांनी संपूर्ण गाण्यात त्यांचा बेबी बंप त्यांच्या ड्रेसने लपवला होता.
advertisement
( ग्लॅमरस अभिनेत्री होणार खासदार! कोण आहे कोएल मल्लिक? जिला मिळालं राज्यसभेचं तिकीट )
हे गाणं शूट झालं तेव्हा हेमा मालिनी ईशा देओलच्या वेळी पहिल्या प्रेग्नंट होत्या. प्रेग्नंसीमध्येही त्या काम करत होत्या. हेमा मालिनी यांच्यावर या व्यतिरिक्तही अनेक होळीची गाणी शूट करण्यात आली आहेत. त्यातील 'होली के दिन दिल' आणि 'होली खेले रघुवीरा' सारखी होळीची गाणी त्यांना फार आवडतात. ही दोन गाणी वाजल्याशिवाय होळी आहे असा वाटतच नाही. यातील 'होली के दिन दिल' हे गाणं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर शूट करण्यात आलं आहे. तर 'होली खेले रघुवीरा' हे गाणं हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर शूट करण्यात आलं आहे.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची भेट 1970 मध्ये 'तुम हसीन मैं जवान' या चित्रपटात काम करत असताना झाली. त्यांच्यात जवळीक वाढली. पण त्यावेळेस धर्मेंद्र यांचं लग्न झालं होतं. तरीही त्यांनी 1980 मध्ये लग्न केले. त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल अशा दोन मुली झाल्या.
