ममूटींच्या चित्रपटाने जिंकले 10 पुरस्कार
राहुल सदाशिवन दिग्दर्शित 'ब्रमयुगम' या चित्रपटात ममूटींसोबत अर्जुन अशोकन आणि सिद्धार्थ भारतन यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अलीकडील 55 व्या केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवला. ममूटींना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय या चित्रपटाने सर्वोत्तम पार्श्वसंगीतासह इतर अनेक पुरस्कार पटकावले. ब्रमयुगम ने केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये चार प्रमुख पुरस्कार जिंकले आणि 2024 मधील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.
advertisement
सुनील शेट्टीची सून होणार ही मराठी अभिनेत्री; रितेश देशमुखच्या सिनेमात केलंय काम
काय आहे ‘ब्रमयुगम’ची कथा
ब्रमयुगमची कथा 18 व्या शतकातील केरळमधील एका ओसाड प्रदेशात घडते. गुलामीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका लोकगायक (थेवन) याच्या भोवती कथा फिरते. घनदाट जंगल, एकाकी वातावरण आणि तणावाने भरलेले दृश्य यामुळे कथा अधिक रोमांचक बनते. थेवन पळून जाण्याची योजना आखतो, पण त्याला हवेलीच्या मालक कोडुमोन पोट्टी (ममूटी) यांच्या भयावह योजनेचा सामना करावा लागतो, ज्यात अनेक भीतीदायक वळणे दिसतात. या ब्लॅक-अँड-व्हाईट पीरियड ड्रामाची कथा आणि सिनेमॅटोग्राफी इतकी प्रभावी आहे की एकदा पाहिल्यानंतर चित्रपट विसरणे कठीण आहे.
70 वर्षांचे ममूटी झाले खलनायक
या हॉरर-थ्रिलरमध्ये मलयाळम सुपरस्टार ममूटी यांनी एक भयानक खलनायकाची भूमिका साकारली आहे. ते एका दुष्ट काळ्या जादूगाराच्या रूपात दिसतात आणि त्यांच्या वेशभूषा व अभिनयाने प्रेक्षकांमध्ये भीती निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. दुसरीकडे, अर्जुन अशोकन आणि सिद्धार्थ भारतन यांनीही ब्रमयुगममध्ये दमदार कामगिरी केली आहे. सत्तेच्या आणि खोटेपणाच्या खेळात अडकलेल्या दोन प्याद्यांच्या भूमिकेत या दोघांचा अभिनय अस्वस्थ करणारा आणि प्रभावी ठरतो. सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.
