दडपे पोहे बनवण्यासाठी साहित्य
दडपे पोहे बनवण्यासाठी अगदी घरातीलच साहित्य लागते. पातळ पोहे, साखर, दूध, तेल, मोहरी, जिरे कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, हळद, शेंगदाणे, कांदा, खोवलेला नारळ, कोथिंबीर, लिंबू आणि चवीनुसार मीठ.
Health Tips : हिवाळ्यात गरम जेवणात नक्की टाका 1 चमचा तूप, शरिरासाठी आहे एक नंबर!
पोहे बनवण्याची कृती
advertisement
दडपे पोहे बनवण्यासाठी पातळ पोहे घ्या. पोहे स्वच्छ निवडून, त्यात साखर, मीठ, ओलं खोबरे, दूध आणि थोडा बारीक चिरलेला कांदा घालून हलक्या हाताने मिक्स करा आणि अर्धा तास भिजत ठेवा. दरम्यान कढईत तेल गरम करून शेंगदाणे तळा व बाजूला ठेवा. त्याच तेलात मोहरी, जीरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, हळद आणि हिंग घालून फोडणी तयार करा.
फोडणी थोडी गार झाल्यावर लिंबूरस घालून ही फोडणी भिजवलेल्या पोह्यावर टाका आणि मिक्स करा. शेवटी कोथिंबीर, ओलं खोबरे आणि शेव घाला. अशा प्रकारे स्वादिष्ट दडपे पोहे खाण्यासाठी तयार होतात. ही रेसिपी रोजचा कांदेपोह्यांचा कंटाळा आल्यावर बनवू शकता. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील, असं वसुंधरा सांगतात.





