TRENDING:

'मी स्वतःसाठीच खेळणार', नॉमिनेशन टास्कमध्ये दिसले रुचिताचे खरे रंग, टोळीमध्ये भूकंप! विशालला मोठा धक्का, VIDEO

Last Updated:

Bigg Boss Marathi 6: आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये रुचिताने आपल्याच ग्रुपला उघडपणे आव्हान दिलं आहे. हे पाहून विशाल, सागर आणि प्राजक्ता यांचा पारा चढला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' चा सातवा आठवडा सुरू झालाय आणि पहिल्याच दिवशी घरामध्ये नात्यांचे मुखवटे फाटायला सुरुवात झाली आहे. नॉमिनेशनची टांगती तलवार डोक्यावर येताच, ज्या 'टोळी'च्या गप्पा मारल्या जात होत्या, त्याच टोळीत आता उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे आजचा नॉमिनेशन टास्क, जिथे रुचिताने आपल्याच ग्रुपला उघडपणे आव्हान दिलं आहे.
News18
News18
advertisement

प्राजक्ताची हुशारी नडली, प्रभूचा गेम यशस्वी

नॉमिनेशन प्रक्रियेपूर्वीच घरामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यात मिळालेली 'पॉवर की' प्राजक्ता शुक्रेला महाद्वारात जमा करायची होती, पण प्रभूने ती आधीच चोरल्यामुळे प्राजक्ता रिकाम्या हाताने उभी होती. नियमानुसार, ती चावी प्रभूने जमा केली आणि प्राजक्ताला मिळणारी एम्युनिटी प्रभूला मिळाली. यामुळे कॅप्टन तन्वी, चावी असलेली अनुश्री आणि चावी चोरणारा प्रभू हे तिघे या आठवड्यात सेफ' झाले आहेत.

advertisement

'महाभारत'ची 'द्रोपदी' 11 वर्ष लहान सिंगरच्या प्रेमात, नवऱ्याला सोडून राहिली लिव्ह-इनमध्ये, धोका मिळाल्यावर केलं असं काही की...

रुचितावर विशाल भडकला

आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांच्या गळ्यात एकमेकांचे फोटो अडकवण्यात आले आहेत. यातला सर्वात मोठा ड्रामा घडला तो रुचिता, दिपाली आणि राकेश यांच्यात. रुचिताच्या गळ्यात राकेशचा फोटो आहे, तर दिपालीच्या गळ्यात रुचिताचा फोटो आहे.

advertisement

रुचिताला राकेशला नॉमिनेट करायचं होतं, पण तिने तसं केलं नाही. याचं साधं कारण म्हणजे, जर रुचिताने राकेशला वाचवलं, तर दिपाली रुचिताला वाचवणार होती. ही डील पाहून विशाल, सागर आणि प्राजक्ता यांचा पारा चढला. विशालने तिला जाब विचारला असता रुचिताने ठणकावून सांगितलं, "मला आता टोळी-काटा ग्रुपशी काहीच देणंघेणं नाही. या क्षणाला मी फक्त स्वतःसाठी खेळणार." रुचिताचा हा पवित्रा पाहून तिला 'शब्दाची पक्की नाही' असे टोमणेही मिळाले.

advertisement

कोणाच्या गळ्यात कोणाचा फोटो?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ, सोप्या पद्धतीने बनवा गोड सांदणे, रेसिपीचा Video
सर्व पहा

यावेळचा नॉमिनेशन टास्क अतिशय गुंतागुंतीचा आहे, कारण स्पर्धकांचं भविष्य दुसऱ्याच्या हातात आहे. सागरच्या गळ्यात आहे दिपालीचा फोटो, राकेशकडे रोशनचा फोटो, रुचिताकडे राकेशचा फोटो, दिपालीकडे रुचिताचा फोटो, विशालकडे सागरचा फोटो, प्राजक्ताकडे विशालचा फोटो, राखीकडे प्राजक्ताचा फोटो आणि रोशनकडे राखीचा फोटो आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी स्वतःसाठीच खेळणार', नॉमिनेशन टास्कमध्ये दिसले रुचिताचे खरे रंग, टोळीमध्ये भूकंप! विशालला मोठा धक्का, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल