TRENDING:

Shahid Kapoor News: 'मराठी चित्रपटांत काम करायची संधी मिळाली, तर...' शाहिद कपूर मराठी इंडस्ट्रीविषयी काय म्हणाला?

Last Updated:

चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त शाहिद कपूरने एका मुलाखतीमध्ये मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत पुन्हा एकदा कोणत्याही चित्रपटांमध्ये काम करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: विशाल भारद्वाज दिग्दर्शित, 'ओ रोमियो' चित्रपटाची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी चित्रपटातून एकत्रित भेटीस येत आहेत. येत्या 13 फेब्रुवारी 2026 रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. एकंदरितच व्हेलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त शाहिद कपूरने 'मुंबई टाईम्स'सोबत बातचीत केली. यावेळी अभिनेत्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोबतच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Shahid Kapoor: ज्याने प्रसिद्धी दिली, त्याबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला; 'ओ रोमियो'च्या रिलीज पूर्वी अभिनेता काय म्हणाला?
Shahid Kapoor: ज्याने प्रसिद्धी दिली, त्याबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला; 'ओ रोमियो'च्या रिलीज पूर्वी अभिनेता काय म्हणाला?
advertisement

मुलाखती दरम्यान शाहिदला मराठी चित्रपट पाहतोस का आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारला होता. याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला की, "मला फार मराठी चित्रपट माहिती नाहीत. थोडेफार माहिती आहेत. परंतु मराठी चित्रपटांचा आशय- विषय फार सुंदर असतात. त्यामुळे ते पाहण्याची इच्छा प्रेक्षकांना सहाजिकच होते. कोणत्याही भाषेमध्ये काम करण्यापूर्वी तुम्हाला ती भाषा माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला त्या भाषेची जाण असणं आवश्यक आहे, शिवाय भाषेवर प्रभुत्व मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. जर भविष्यात मला मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी आली तर मी नक्की संधी मिळवेल. पण सर्वात आधी मी मराठी भाषा शिकेल आणि तेव्हाच अभिनय करेल."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AC चं बिल येईल शुन्य रुपये! 3-4 अंशावर रूम होईल गार, किंमत ऐकून बसेल शॉक!
सर्व पहा

शाहिदने नाना पाटेकरांसोबत यापूर्वीही काम केले आहेत. त्यांनी 2010 साली रिलीज झालेल्या 'पाठशाला' चित्रपटात आणि आता 'ओ रोमियो' अशा दोन चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. त्यांच्यासोबतच्या कामाचा शाहिदचा अनुभव फार विशेष आहे, त्यामुळे त्याने पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबतचा कामाचा अनुभव शेअर करताना शाहिद म्हणाला की, "अविस्मरणीय! खूप अनुभवी आणि उत्तम अभिनेते आहेत ते. नानांसोबत काम करताना मला शुटिंगवेळी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्या दोघांची केमिस्ट्री जुळली होती. त्यांच्यासोबत मला पुन्हा काम करायला नक्की आवडेल"

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Shahid Kapoor News: 'मराठी चित्रपटांत काम करायची संधी मिळाली, तर...' शाहिद कपूर मराठी इंडस्ट्रीविषयी काय म्हणाला?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल