90 च्या दशकात अभिनेत्री रवीना टंडनचा मोठा चाहता वर्ग होता. यामध्ये पाकिस्तानही मागे नव्हता. त्या काळात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ देखील रवीनाचे चाहते होते. एका मुलाखतीत नवाज शरीफ यांनी उघडपणे कबूल केले होते की रवीना टंडन त्यांची आवडती अभिनेत्री आहे. हे विधान करताच चर्चेची लाट उसळली होती. त्याच वर्षी कारगिल युद्ध पेटले आणि भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एक अनोखा, पण मिशकील मार्ग निवडला.
advertisement
कारगिल युद्धादरम्यान, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दिशेने काही क्षेपणास्त्रे पाठवली. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रांवर लिहिले होते, "रवीना टंडनकडून नवाज शरीफसाठी". या संदेशासोबत एक हृदयाचे चिन्ह देखील रंगवण्यात आले होते. हा फोटो जेव्हा समोर आला, तेव्हा देशभरातून हास्याच्या लाटा उसळल्या आणि भारतीय सैन्याच्या मिशकील पण ठाम उत्तराचे सर्वांनी कौतुक केले.
दरम्यान, रवीना टंडनने देखील या घटनेवर हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, “जर देशाच्या रक्षणासाठी मला सीमेवर उभे रहावे लागले, तर मी गर्वाने आणि आदराने जाईन.” सध्या भारत विरुद्ध पाक वॉर पेटले असताना या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.