IND VS PAK: भारतासाठी आजची रात्र वैऱ्याची...'स्टार दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल, म्हणाले, 'सैनिकांसाठी प्रार्थना करा'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
IND VS PAK : पाकिस्तानने आता थेट भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे पाकिस्तानने भारताच्या 15 मोठ्या शहरांना लक्ष्य करून तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, पाकिस्तानने आता थेट भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे पाकिस्तानने भारताच्या 15 मोठ्या शहरांना लक्ष्य करून तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सुरक्षा दलांनी त्यांच्या या नापाक मनसुब्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याचा कट उधळल्यानंतर आता फिल्ममेकरने भारतासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
भारताने पाकिस्तानच्या ड्रोन आणि विमानाला उडवल्यानंतर आता फिल्ममेकर अशोक पंडीत यांनी एक पोस्ट शेअर केली जी सध्या चर्चेत आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "आजची रात्र पाकिस्तानसाठी नरकमय रात्र असेल, माझे शब्द लक्षात ठेवा, भारतीय सैन्य दलांसाठी प्रार्थना करा."
पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि गुजरातसह उत्तर आणि पश्चिम भारतातील 15 शहरांना लक्ष्य करून लष्करी ठिकाणांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला. श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, चंदीगड आणि इतर अनेक शहरांचा यात समावेश होता.
advertisement
advertisement
भारताने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना अनेक ठिकाणी निष्क्रिय केले, ज्यात लाहोरचाही समावेश आहे. भारतीय हवाई दलाने 'हार्पी' ड्रोनचा वापर करून पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला उद्ध्वस्त केले, तर भारताच्या 'S-400' या स्वदेशी बनावटीच्या संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या मिसाइल्स हवेतच नष्ट केल्या. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर करत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. या हल्ल्यांचे अवशेष विविध ठिकाणी सापडले असून, त्यांची तपासणी सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 08, 2025 10:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
IND VS PAK: भारतासाठी आजची रात्र वैऱ्याची...'स्टार दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल, म्हणाले, 'सैनिकांसाठी प्रार्थना करा'