विराटला 'जोकर' म्हणताच संतापला क्रिकेटरचा भाऊ, राहुल वैद्यला झापलं, म्हणाला, 'देशात चाललंय काय आणि हा मूर्ख...'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
virat kohli rahul vaidya controvercy: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर क्रिकेटपटू विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर क्रिकेटपटू विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. याची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा विराटने अभिनेत्री अवनीत कौरच्या एका पोस्टला लाईक केले आणि नंतर त्याला 'इंस्टाग्रामची अल्गोरिथम' म्हणून स्पष्टीकरण दिलं. मात्र, राहुल वैद्यने या स्पष्टीकरणावर खोचक टिप्पणी करत विराटला डिवचलं, ज्यामुळे दोन्ही सेलिब्रिटींच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपली.
राहुल वैद्यने विराटला आणि चाहत्यांना जोकर म्हटलं. त्यामुळे राहुल वैद्यला सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशातच राहुलच्या या टीपणीवर विराटच्या भावाने गायकाला सुनावलं आहे.
विराटचा भाऊ विकास कोहली यांनी मात्र राहुल वैद्यला सडेतोड उत्तर दिलं आहे. विकासने गायकावर चांगलाच राग काढला आणि त्याला लुझर म्हटलं. आपल्या पोस्टमध्ये विकास लिहितो, "जर ही मुलं त्यांच्या गायनावर एवढीच मेहनत घेत असतील, तर कदाचित ते त्यांच्या मेहनतीने प्रसिद्ध होतील. ज्यावेळी संपूर्ण देश देशात काय चाललंय यावर लक्ष केंद्रित करत आहे, त्यावेळी हा मूर्ख फॉलोअर्स मिळवण्याच्या मोहिमेवर आहे. किती वाईट गोष्ट आहे ही."
advertisement
या वादाची ठिणगी राहुल वैद्य यांच्या एका टोमण्यामुळे पडली. विराटने लाईकबद्दल खुलासा केल्यानंतर राहुलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "मला हे सांगायचं आहे की आजनंतर काही अल्गोरिदमला असे अनेक फोटो आवडतील जे मला आवडले नाहीत. म्हणून मुलगी कोणीही असो, याभोवती मला घेरुन करू नका. ही इंस्टाग्रामची चूक आहे."

विराट कोहली राहुल वैद्य कॉन्ट्रोवर्सी
advertisement
राहुल वैद्य इथेच थांबला नाहीत, तर त्याने असा दावा करत या वादात आणखी तेल ओतलं की, यानंतर विराटने त्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे आणि हेसुद्धा कदाचित प्लॅटफॉर्मचीच चूक असू शकते. त्यानी आपल्या स्टोरीमध्ये लिहिलं होतं, "मित्रांनो, विराट कोहलीने मला इंस्टावर ब्लॉक केलं आहे. ही देखील इंस्टाची चूक असेल."
दरम्यान, आता विराटच्या भावाने राहुलला 'लूजर' म्हटल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या चाहत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 09, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
विराटला 'जोकर' म्हणताच संतापला क्रिकेटरचा भाऊ, राहुल वैद्यला झापलं, म्हणाला, 'देशात चाललंय काय आणि हा मूर्ख...'