ज्यांची मापं काढली त्यांनाच शरण गेली, कंगनाचा यू-टर्न; बॉलिवूडमध्ये आपटल्यावर अभिनेत्रीचा मोठा निर्णय!

Last Updated:

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आपल्या बेधकड स्वभाव, स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. प्रत्येक मुद्द्यावर ती आपली मतं मांडत असते.

 कंगनाचा यू-टर्न
कंगनाचा यू-टर्न
मुंबई :  बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आपल्या बेधकड स्वभाव, स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. प्रत्येक मुद्द्यावर ती आपली मतं मांडत असते. बऱ्याचदा यामुळे तिला अडचणींचाही सामना करावा लागतो. अशातच कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी काही वेगळच कारण आहे. बॉलिवूडमध्ये सिनेमा फ्लॉप होत असल्यामुळे कंगना आता हॉलिवूडकडे वळाली आहे.
बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आता हॉलिवूडमध्ये पाऊल टाकत आहे. तिचा आगामी प्रोजेक्ट ‘Blessed Be The Evil’ हा एक हॉरर चित्रपट असून यात ती स्कारलेट स्टॅलोन (Sylvester Stallone यांची मुलगी) आणि टायलर पोसी यांच्यासोबत झळकणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण यावर्षी उन्हाळ्यात न्यू यॉर्कमध्ये होणार आहे.
advertisement
हॉलिवूडमध्ये कंगनाचं पहिलं पाऊल
‘Blessed Be The Evil’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग रुद्र करत असून ही कथा भारताच्या पारंपरिक लोककथांवर आधारित आहे, पण पार्श्वभूमी मात्र पाश्चात्य असणार आहे. सध्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी योग्य लोकेशन शोधण्याचं काम सुरू आहे. कंगनाची यात नेमकी भूमिका काय असणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे कंगनाचं बदललेलं मत. कारण, 2017 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर टीका केली होती. तिचं म्हणणं होतं की, "पश्चिमेकडे जाणं हे मूर्खपणाचं आहे. डिजिटल मीडियामुळे तिथला थिएटर व्यवसाय ढासळतोय. आपल्याकडेच (भारतामध्ये) सध्या उत्तम संधी आहेत." ती पुढे म्हणाली होती, "मी हॉलिवूडच्या थाळीत आपली सेवा मांडणार नाही." याच मुलाखतीत तिने आशियाई चित्रपटसृष्टीला भविष्यातील हॉलिवूड म्हणत कौतुक केलं होतं. तिने ‘थलाईवी’च्या प्रमोशनवेळीही असं म्हटलं होतं की, भारतीय प्रेक्षकांनी स्थानिक चित्रपटांना प्राधान्य द्यायला हवं, आणि इंग्रजी चित्रपटांचा अतिरेक रोखायला हवा.
advertisement
कंगना राणौत ही भारतीय चित्रपटसृष्टीतील वादग्रस्त पण प्रभावशाली अभिनेत्री आहे. ती अनेकदा तिच्या परखड मतांमुळे चर्चेत असते. आता तीच अभिनेत्री हॉलिवूडमध्ये झळकणार असून तिच्या नव्या प्रवासाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
ज्यांची मापं काढली त्यांनाच शरण गेली, कंगनाचा यू-टर्न; बॉलिवूडमध्ये आपटल्यावर अभिनेत्रीचा मोठा निर्णय!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement