'चहा'बनवण्यासाठी मलायकाची करामत
'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक त्यांचे कौशल्य दाखवत आहेत. ज्यामुळे सगळेच थक्क होत आहेत. या कार्यक्रमातील एका स्पर्धकाने आपल्या डोक्यावर एका ग्लासवर गॅस ठेवला होता. अशातच मलायकाने हा प्रकार आणखी मजेदार केला. मलायकाने चक्क या स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवलेल्या गॅसवर पातेलं ठेवलं आणि त्यात चहा बनवला.
advertisement
चहा पिऊन बेशुद्ध पडलो तर तुम्ही जबाबदार : नवजोत सिंह सिद्धू
मलायकाने चहा बनवल्यानंतर तो नवजोत सिंह सिद्धू यांना प्यायला दिला. त्यावेळी सिद्धू म्हणाले की,"मी जर चहा पिऊन बेशुद्ध पडलो, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल". यावेळी मलायका म्हणाली,"नाव आहे मलायका तर चहासोबत थोडी मलाई टाकून मी देते". 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दुसरीकडे चाहत्यांना मलायका आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील बॉन्डिंग आणि त्यांची मस्ती खूप आवडत आहे.
'इंडियाज गॉट टॅलेंट'चा प्रवास 4 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झाला. हा कार्यक्रम टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. या बहुचर्चित कार्यक्रमात मलायक अरोरा, नवजोत सिंह सिद्धू आणि गायक शान परीक्षक म्हणून काम करत आहेत.
