काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट 'क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम' ची घोषणा केली होती. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर मनोरंजन करत भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरच यात कलाकार कोण असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
advertisement
( Huma Qureshi: हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा रचित सिंग? )
यात कलाकारांचे चेहरे जरी दिसत नसले तरी चित्रपटात दमदार कलाकारांची भक्कम फौज पाहायला मिळणार हे नक्की. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, तरुण पिढीचे स्टार्स अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर, लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग, कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळी प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे. या सर्व ताकदीच्या कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल.