TRENDING:

Vinay Anand News: गोविंदाच्या अफेअरवर भाच्याने सगळं सांगितलं, ‘माझ्या मामाबद्दल जे बोललं जातंय ते...’

Last Updated:

सध्या बॉलिवूड अभिनेता गोविंदा वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. गोविंदाच्या भाच्याने गोविंदाच्या एक्स्ट्रा मेरिटियल अफेअर्सबद्दल महत्त्वाचं विधान केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गोविंदा आणि सुनीता गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे कमालीचे चर्चेत आले आहेत. गोविंदाचे कोमल नावाच्या एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा आरोप सुनीताने केला आहे. ती अभिनेत्री गोविंदाचा फायदा घेतेय, असं सुद्धा सुनीताचे मत आहे. सर्वत्र अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मेरिटियल अफेअर्सच्या चर्चा होत असताना आता अभिनेत्याचा भाचा विनय आनंदने पुन्हा एकदा भाष्य केले आहे. त्याने एका युट्यूब चॅनलला मुलाखत देत महत्त्वाचं विधान केलं आहे.
it is not new govindas nephew vinay anand react to actors alleged affair
it is not new govindas nephew vinay anand react to actors alleged affair
advertisement

'हिंदी रश' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विनय आनंदने सांगितलंय की, " मी एकदा मामाला विचारलेलं की, तुमचं कोणासोबत काही अफेअर आहे का? तर त्यांनी मला, 'असं काही नाही', असं उत्तर दिलं. जेव्हा त्यांनी मला नाही उत्तर दिलं, तेव्हा मी त्यांचं म्हणणं ऐकलं. पण जेव्हा मी सुनीता मामीने दिलेल्या मुलाखती ऐकल्या त्यावेळी जरा मला विचित्र वाटलं. कारण, आम्ही कायमच मामीला गोविंदा मामाचा सन्मान करताना पाहलियं." विनयने पुढे मुलाखतीत गोविंदाचे कोणकोणत्या अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलंय, त्याबद्दलही भाष्य केलंय.

advertisement

विनयने पुढे सांगितलं की, "ही गोष्ट पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी सुद्धा मामावर फसवणुकीचे आरोप करण्यात आलेले आहेत. त्याचं नाव निलम, राणी मुखर्जी आणि करिष्मा कपूर या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. सुरूवातीला जेव्हा गोविंदा मामाने नीलम कोठारीसोबत एकत्र काम केलं होतं, तेव्हा सुद्धा त्यांचं नाव जोडलं होतं. त्यानंतर मामाने राणी मुखर्जीसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यावेळी त्यांना एकत्र पाहून अनेकांना त्यांचं अफेअर सुरू आहे का? अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर करिष्मा कपूरसोबतही त्यांनी काम केले होते. तर अनेकांना करिष्मा आणि गोविंदा मामाचं काही अफेअर सुरू आहे, असं वाटलं होतं."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी पौष्टिक, सोप्या पद्धतीने घरीच बनवा सोयाबीन खिमा, रेसिपीचा Video
सर्व पहा

यानंतर पुढे विनयने मिश्किल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, "मी तर सध्या हाच विचार करतोय की, माझ्या मामाचं सध्या 62 वय आहे, तो 62 व्या वर्षीही इतका चिरतरूण कसा काय असू शकतो? मी त्यांना खरोरखर विचारलं होतं, पण खरोखर असं काही नाहीये. गोविंदा मामा खूप मेहनती आहे. ज्या मामाच्या फिलिंग्स आहेत, त्या फिलिंग्स मामी समजू शकते आणि मामीच्याही फिलिंग्स आहेत, त्या सुद्धा मामाला समजून घ्यावे लागतील."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Vinay Anand News: गोविंदाच्या अफेअरवर भाच्याने सगळं सांगितलं, ‘माझ्या मामाबद्दल जे बोललं जातंय ते...’
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल