ETimes च्या वृत्तानुसार, चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि त्यांच्या मुली खुशी कपूर आणि जान्हवी कपूर यांनी मुंबईतील अंधेरी भागातील त्यांचे चार अपार्टमेंट विकले आहेत. हे फ्लॅट अंधेरीच्या ग्रीन एकर्स भागात आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या दुसर्या रिपोर्टमध्ये या किमतीचा खुलासा करण्यात आला असून हे फ्लॅट 12 कोटींहून अधिक किमतीत विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. दोन फ्लॅट 6.02 कोटींना विकले गेले, तर आणखी दोन फ्लॅट 6 कोटींना विकले गेले.
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खुशी आणि जान्हवीच्या चार अपार्टमेंटपैकी सर्वात मोठ्या फ्लॅटचे क्षेत्रफळ 1870 स्क्वेअर फूट होते. तो सिद्धार्थ नारायण आणि अंजू नारायण यांना विकली गेली आहे. याशिवाय इतर दोन फ्लॅट्सचे एकूण क्षेत्रफळ 1614 स्क्वेअर फूट असून त्यांना मुस्कान बहिरवानी आणि ललित बहिरवानी यांच्या रूपाने नवीन मालक मिळाले आहेत.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, तिने 2018 मध्ये धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर जान्हवी कपूर मिली, गुड लक जेरी, गुंजन सक्सेना: द कारगिल गर्लसह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची अभिनेता वरुण धवनसोबत 'बवाल' या चित्रपटात दिसली होती. जान्हवी कपूरकडे आगामी काळात देखील अनेक चित्रपट आहेत. ती लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये दिसणार आहे. त्याचसोबत 'उल्झन' मध्येही ती दिसणार आहे. 'उल्झन'मध्ये जान्हवी कपूरसोबत गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत.
खुशी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, खुशी कपूरने तिची बहीण जान्हवी आणि आई श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवत झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. खुशी व्यतिरिक्त या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा, युवराज मेंडा, मिहिर आहुजा, वेदांग रैना आणि अगस्त्य नंदा देखील होते. करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टमध्ये खुशी लवकरच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.