कंगनाचे वडील अमरदीप रणौत यांनी स्पष्ट केलं आहे की, कंगना भाजप पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पण ती कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहे हे पक्षानं ठरवायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगनानं दोन दिवस आधी कुल्लू येथील आपल्या घरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत निवडणूकीसंबंधी बोलणं झाल्याचं म्हटलं जातंय. कंगाने दोघांच्या भेटीचे फोटो शेअर केलेत.
advertisement
इतकंच नाही तर मागील आठवड्यात कंगना हिमाचलच्या बिलासपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोशल मीट कार्यक्रमातही गेली होती. या ठिकाणी कंगनानं म्हटलं होतं की, RSSचे विचार तिच्या विचारधारेशी मिळते जुळते आहेत. कंगनाही मंडी लोकसभा सीटवर चंदीगडमधून निवडणूक लढवेल अशा चर्चा आहेत.
कंगना मंडी जिल्ह्यातून निवडूक लढण्याच्या शक्यता अधिक आहे कारण कंगना मूळची मंडी जिल्ह्यातील सरकाघाट विधानसभा मतदारसंघातील भांबला गावची रहिवासी आहे. तिनं मागील काही वर्षांआधी मनालीमध्ये त्यांनी स्वतःचं घर बांधलं आहे. त्यामुळे तिचं संपूर्ण कुटुंब आता मनालीतच राहतं.
इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी कंगना रणौतनं गुजरातमधील द्वारका येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, जर देवाचा आशीर्वाद असेल तर ती नक्कीच निवडणूक लढवेल. यानंतर कंगना निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला.