Pushpa Actor Crime Confession : पुष्पा फेम अभिनेत्याची गुन्ह्याची कबुली; ज्युनियर फिमेल आर्टिस्टने केली होती आत्महत्या

Last Updated:

सुकुमार यांनी ब्लॉकबस्टर पॅन-इंडिया अ‍ॅक्शन ड्रामा, 'पुष्पा-द राइज' दिग्दर्शित केला अल्लू अर्जुनचा मित्र 'केशव' ही भूमिकाही लोकप्रिय झाली. चित्रपटातील मुख्य अभिनेत्यासोबतच 'केशव'चेही लोकांनी कौतुक केले आहे.

News18
News18
मुंबई, 19 डिसेंबर : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट 'पुष्पा' फेम 'केशव' म्हणजेच अभिनेता जगदीश प्रताप बंदरी याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्युनियर महिला कलाकाराच्या मृत्यूप्रकरणी, अभिनेता जगदीशने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. नैराश्यामुळे अभिनेत्रीने 29 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी या अभिनेत्याला 6 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते.
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा-द राइज' या ब्लॉकबस्टर पॅन-इंडिया अ‍ॅक्शन ड्रामामध्ये अल्लू अर्जुनचा मित्र 'केशव' या भूमिकेसाठी लोकप्रिय आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्यासोबतच 'केशव'च्या व्यक्तिरेखेलाही लोकांनी भरभरून प्रेम दिले. पण 'केशव' म्हणजेच अभिनेता जगदीश प्रताप बंदरी याच्या चाहत्यांना धक्काच बसला जेव्हा एका ज्युनियर महिला कलाकाराच्या मृत्यूनंतर त्याचे नाव या प्रकरणात पुढे आले. आता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
advertisement
काय होते प्रकरण
ही बाब 29 नोव्हेंबरची आहे. वास्तविक, एका ज्युनियर आर्टिस्टने गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता, जगदीशने खासगी फोटोंच्या मदतीने मुलीला ब्लॅकमेल केल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे तिने आत्महत्या केली. जगदीशने गुपचूप महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत फोटो काढले होते. या प्रकरणाच्या तपासानंतर जगदीशला पुंजागुट्टा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
advertisement
कबुल केलेला गुन्हा
TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार, चौकशीनंतर जगदीशने आता आपला गुन्हा कबूल केला असून त्याने चुकीच्या हेतूने महिलेचे फोटो काढल्याचे कबूल केले आहे. या अभिनेत्याने कबुली दिली आहे की, त्याने आपल्या ज्युनियर महिला कलाकाराला हे फोटो लोकांसमोर आणण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले होते.
ते एकतर्फी प्रेम होते!
जगदीशने पोलिसांना सांगितले की, तो तिला एकतर्फी पसंत करतो. पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली देताना त्याने मुलीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होते आणि त्याला पाहून त्याचा हेवा वाटू लागल्याचेही सांगितले. जगदीश त्या मुलीला पाच वर्षांपासून ओळखत होता.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa Actor Crime Confession : पुष्पा फेम अभिनेत्याची गुन्ह्याची कबुली; ज्युनियर फिमेल आर्टिस्टने केली होती आत्महत्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement