मंगळवारी मुंबईमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये कंगना रणौतच्या 'लॉकअप 2' या शोचा सुद्धा समावेश होता. या यादीमध्ये अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आणि निर्माती एकता कपूर यांचाही समावेश होता. चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर 'लॉकअप'चा दुसरा सीझन येणार आहे. तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे. खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत या रिॲलिटी शोचं सुत्रसंचालन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता कंगना खासदार झाल्या आहेत, त्यामुळे त्या सुत्रसंचालन करणार आहेत की नाही, हे अद्याप समोर आलेलं नाही.
advertisement
3 फेब्रुवारीच्या दिवशी, नेटफ्लिक्सकडून 'लॉकअप 2' च्या रिलीजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा रिअॅलिटी शो पहिल्यांदा 2022 मध्ये अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आला होता. अभिनेत्री कंगना राणौतने 71 भागांचा पहिला सीझन होस्ट केला होता आणि तिच्या होस्टिंगला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता फार मोठ्या ब्रेकनंतर 'लॉकअप 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना रणौत एकता कपूरचा रिअॅलिटी शो होस्ट करेल का, सध्या, या प्रकरणावर कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. शिवाय, लॉक अप सीझन २ ची रिलीज तारीख जाहीर केलेली नाही.
