कतरिना कैफ आणि विकी कौशल अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. कतरिना-विकी ही अनेकांची फेव्हरेट जोडी आहे. प्रेग्नंट कतरिनाला याआधी अनेकदा स्पॉट करण्यात आले. प्रेग्नंसीमधला अभिनेत्रीचा फोटोदेखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. अशातच आता आशीर्वाद आणि ॐ असं कॅप्शन देत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. विकी-कतरिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"आमच्या आनंदाची छोटी भेट आम्हाला मिळाली आहे. आभार व्यक्त करत आम्ही आमच्या छोट्या बाळाचं स्वागत करत आहोत. 7 नोव्हेंबर 2025 कतरिना आणि विकी". विकी-कतरिनाच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
लग्नाच्या चार वर्षांत गुडन्यूज
अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमधील सिक्स सेंसेस फोर्ट बरवाडा येथे एक शाही थाटात बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. या लग्नात फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्र सहभागी झाले होते. सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी “नो फोन पॉलिसी” ठेवण्यात आली होती. या जोडप्याचं लग्न हे बॉलिवूडमधील एक चर्चेचा विषय होता.
अशी झालेली कतरिना-विकीची पहिली भेट
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची पहिली भेट 2019 मध्ये एका स्क्रीन अवॉर्ड्समध्ये झाली. या कार्यक्रमात विकी कौशल होस्ट होता. स्टेजवर सगळं काही स्क्रिप्टेड आणि प्रोफेशनल होते. पण कतरिनासोबत तो पहिल्यांदा बॅकस्टेजला भेटला. त्यानंतर करण जौहरच्या एका पार्टीत पुन्हा एकदा दोघांची भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
