'कान्स'मध्ये चित्रपट पाठवण्यावरून गोंधळ!
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांच्या पहिल्याच मराठी चित्रपट 'खालिद का शिवाजी'ची निवड 'मार्शे दु फिल्म' या विभागासाठी करण्यात आली होती. याची घोषणा खुद्द मंत्री आशिष शेलार यांनी तीन महिन्यांपूर्वी केली होती. पण आता हाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
advertisement
Shweta Menon : पैशांसाठी बनवले अश्लील चित्रपट, सलमान-शाहरुखच्या हिरोईनवर गुन्हा दाखल
'महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारां'च्या हीरक महोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळीही या चित्रपटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हिंदू महासंघाने या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
आशिष शेलार यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आशिष शेलार यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, "ज्या निवड समितीने हा चित्रपट महोत्सवासाठी पाठवण्याची भूमिका घेतली, त्यांनी योग्य अभ्यास केला होता का? चित्रपट पाहिला होता का? कथा वाचली होती का? त्यात काही खोडसाळपणा होता का? या सर्व गोष्टींची चौकशी तातडीने करावी."
त्यांनी सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि 'सीबीएफसी'शी संपर्क साधून चित्रपटाच्या प्रमाणपत्राचा फेरविचार करण्याची भूमिका घेण्यासंदर्भात चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. ८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, पण हा वाद आता आणखी वाढत चालला आहे.
