TRENDING:

'या माप घेतो...' अजितकुमार देव, देवीसिंगनंतर 'देवमाणूस' नव्या रुपात, खतरनाक प्रोमो रिलीज

Last Updated:

Devmanus 3 Madhla Adhyay : 'देवमाणूस' मालिकेचा तिसरा सीझन लवकरच येणार आहे. अजितकुमार देव आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. प्रोमो व्हायरल झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टेलिव्हिजनवरील काही लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका म्हणजे देवमाणूस. मालिकेच्या पहिल्या दोन सीझनने प्रेक्षकांची मनं जिंकली. अजितकुमार देव म्हणजेच सगळ्यांचा लाडका देवमाणूस. ज्याच्यावर लोक विश्वास ठेवतात तोच साध्याभोळ्या लोकांचा विश्वासघात करून त्यांची थेट हत्या करतो. स्त्रियांना मारून त्यांची जागोजागी कलमं लावणारा या देवमाणसाचा जबरदस्त थ्रील या मालिकेत दाखवण्यात आला होता. हा थ्रीलर देवमाणूस परत आलाय म्हणत मालिकेच्या दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. दुसऱ्या सीझननंतर आता तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच देवमाणूस मधला अध्यायची घोषणा करण्यात आली आहे. मालिकेचा दमदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. नवा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आता नव्या सीझनमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
News18
News18
advertisement

पहिल्या सीझनमध्ये देवमाणूस मेला असं दाखवण्यात आलं होतं. पण दुसऱ्या सीझनमध्ये तो मेला नसून जिवंत आहे असं दाखवण्यात आलं. देवमाणूस वेशांतर करून पुन्हा एकदा गावात येतो आणि बायकांना फसवतो. दुसऱ्या सीझनमध्ये देवमाणसाला फासावर चढवताना दाखवलं होतं. मग आता तिसऱ्या सीझनमध्ये नेमकं काय दाखवणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

( Rinku Rajguru: 'माझ्या पर्मनंटसोबत डिनर डेटवर' रिंकू राजगुरुच्या आयुष्यातील 'ती' खास व्यक्ती कोण? )

advertisement

देवमाणूस मधला अध्यायच्या नव्या प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, देवमाणूस पहिल्या सीझनमध्ये मेला आहे असं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये तो पुन्हा गावात येतो. पहिल्या सीझनमध्ये मेला असं दाखवण्यात आलेला देवमाणूस नेमका कुठे गेला हा प्रवास तिसऱ्या सीझनमध्ये दाखवण्यात येणार आहे. अजितकुमार देव, देवीसिंगनंतर देवमाणूस आता गोपाळराव म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोपाळराव जो शिंपी दाखवण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!
सर्व पहा

फक्त 'सुई' बदलली आहे, 'देवमाणूस' तोच आहे. ‘देवमाणूस’ -‘मधला अध्याय’ असं म्हणत या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे. ज्यात अभिनेता किरण गायकवाड पुन्हा एकदा देवमाणूसच्या भूमिकेत दिसत आहे. यावेळी देवमाणासाचा शिंपी झालेला पाहायला मिळतोय. जो कपडे शिवण्याच्या बहाण्याने पुन्हा स्त्रियांचा घात करतो. तर दुसरीकडे खवट, खट्याळ अन् जबरदस्त म्हणींमधून समोरच्याचा पाणउतारा करणारी सरू आजी देखील पाहायला मिळतेय. देवमाणूस तीनचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पण देवमाणूस मधला अध्याय कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'या माप घेतो...' अजितकुमार देव, देवीसिंगनंतर 'देवमाणूस' नव्या रुपात, खतरनाक प्रोमो रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल