अंकिताने तिच्या कोकण हार्टेड बॉयची घोषणा केली तेव्हापासून चाहत्यांनी त्याचा शोध घेणं सुरू केलं होतं. अखेर त्यांनी लावलेला अंदाच बरोबर ठरला. कुणाल भगत हाच अंकिताचा होणारा नवरा आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करून दिली आहे.
( "अरबाज पाठीत खंजीर खुपसणारा माणूस", जिवलग मित्र कसा निघाला धोकेबाज, वैभवने सांगितल्या A To Z डिटेल्स )
advertisement
सूर जळले... असं म्हणत अंकिताने दोघांचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर अंकिताने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने लिहिलंय, प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगीतलस,काळाच्या ओघात कळलच नाही.आयुष्य कसं कुठे बदललं,तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं.
वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन. दसऱ्याच्या शुभेच्छा
अंकितच्या नवऱ्याने देखील अंकिताला शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने लिहिलंय, तु आयुष्यात आलीस आणि खरं प्रेम ह्या शब्दाचा अर्थ कळला...आपल्या आयुष्यातला सगळयात मोठा निर्णय...आपण लग्न करतोय.तुला खुश ठेवणं,तुला हसवणं,आता माझी सवय झाली आहे..आणि ही माझी सवय नेहमी आशीच ठेवेन …Trust Me. माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा
कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे.कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे. अंकिता आणि कुणाल यांनी आनंदवारी हे गाणं एकत्र केलं होतं.
