कोण आहे ही ‘मिस्ट्री गर्ल’?
लारिसा बोन्सी मूळची ब्राझीलची असून ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने वयाच्या १३ व्या वर्षीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. २०११ मध्ये ती मुंबईत आली आणि ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील ‘सुबा होने ना दे’ या गाण्याने तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
लारिसाने आतापर्यंत ‘गो गोवा गॉन’, ‘थिक्का’, ‘नेक्स्ट एन्टी’ आणि ‘पेंटहाऊस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती अनेक गाण्यांच्या व्हिडिओमध्येही दिसली आहे. याशिवाय तिने अनेक मोठ्या ब्रँड्ससाठीही मॉडेलिंग केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, ती आर्यन खानच्या ‘डी’यावोल एक्स’ या ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे.
advertisement
लारिसा बोन्सीची संपत्ती पाहून डोळे गरगरतील
लारिसा बोन्सीची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर ६ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे, आर्यन खानसोबत शाहरुख खान, सुहाना खान आणि किंग खानची मॅनेजर पूजा ददलानी सुद्धा तिला फॉलो करतात. यामुळेच आर्यन आणि लारिसाच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.
काही रिपोर्टनुसार, लारिसाची एकूण संपत्ती ४० लाख ते ४ कोटी रुपयांपर्यंत असू शकते. आर्यन आणि लारिसा यांच्या वयात ८ वर्षांचं अंतर आहे. या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही, पण त्यांच्या या खास भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.