गौतमी या म्युझिक व्हिडीओमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊतसोबत दिसणार आहे. गौतमीच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये ओंकारला पाहून तिच्या चाहत्यांना विश्वासच बसला नव्हता. ओंकार आणि गौतमी यांचे लग्नाच्या वेषातील व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर जणू भूकंपच आला होता. 'ओंकार आणि गौतमीचं लग्न झालं?' असा प्रश्न विचारत चाहते चक्रावून गेले होते. आता या फिल्मी लग्नाचा पुढचा भाग म्हणून ओंकारने गौतमीसाठी भन्नाट उखाणा घेतला असून, त्याचा हा अंदाज पाहून गौतमी लाजेने लालबुंद झाली आहे.
advertisement
एकच हृदय कितीवेळा जिंकणार...! निक जोनसने घातलंय प्रियांका चोप्राच्या नावाचं मंगळसूत्र, VIDEO
गौतमीसाठी ओंकारचा भन्नाट उखाणा
ओंकारने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो नवरदेवाच्या थाटात दिसतोय. गौतमीच्या उखाण्याला उत्तर देताना ओंकारने आपल्या खास स्टाईलमध्ये उखाणा घेतला, "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज, माझ्या गौतमीसोबत आयुष्य होईल खास!" हा उखाणा ऐकताच गौतमी जो काही लाजली आहे, त्यावर तिचे चाहते घायाळ झाले आहेत. ओंकारने हा व्हिडिओ शेअर करताना चाहत्यांना विचारलंय, "गौतमीचा उखाणा तर तुम्ही ऐकलाच... आता माझा उखाणा कसा वाटला?"
ओंकार आणि गौतमी ही जोडी 'गच्ची' या नवीन म्युझिक व्हिडिओच्या निमित्ताने एकत्र आली आहे. हे गाणं म्हणजे २०१९ मध्ये गाजलेल्या 'गच्चीवरून कशी दिसते' या सुपरहीट गाण्याचं मॉर्डन रिमेक आहे. ओंकारची या गाण्यात छोटी भूमिका असली, तरी गौतमीसोबतची त्याची केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर टॉक ऑफ द टाऊन ठरली आहे. 'हास्यजत्रा'मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या ओंकारला अशा रोमँटिक अंदाजात पाहणं प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरला आहे.
ओंकार राऊत आज केवळ विनोदी कलाकार राहिला नसून, तो एक कसलेला अभिनेता म्हणून नावारूपास आला आहे. छोट्या पडद्यावरून त्याने आपला प्रवास सुरू केला, पण 'हास्यजत्रे'ने त्याला खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवलं. सध्या ओंकार त्याच्या 'थेट तुमच्या घरातून' या नव्या नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यग्र आहे. नाटकातील गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही छटा लिलया पेलणारा ओंकार आता म्युझिक व्हिडिओमध्येही आपला जलवा दाखवत आहे.
