अलीशा चिनॉय आता 'इतक्या' बदलल्या आहेत!
अलीशा चिनॉय सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात आणि नियमितपणे आपले सिंगिंग व्हिडिओज आणि फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला होता, ज्यामध्ये त्यांचा बदलेला लूक आणि अंदाज पाहून सगळेच थक्क झाले. या व्हिडिओमध्ये अलीशा स्टेजवर परफॉर्म करताना दिसत होत्या आणि त्या खूपच बदललेल्या वाटत होत्या. 15 ऑगस्टच्या निमित्ताने अलीशा चिनॉय यांनी उझबेकिस्तानमधील ‘दुनियो सदोलारी’ या फेस्टिवलमध्ये आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
advertisement
पाकिस्तानमध्ये 'या' 5 बॉलिवूड चित्रपटांचा जलवा, Netflix च्या 'TOP 10' यादीत आहेत 'हे' Movies
अलीशा चिनॉयचं पहिला म्युझिक अल्बम कोणता?
अलीशा चिनॉय यांचा पहिला म्युझिक अल्बम ‘जादू’ 1985 साली प्रदर्शित झाला. याच अल्बमद्वारे अलीशाने आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र 1995 मध्ये आलेल्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्याने तिला रातोरात स्टार बनवलं. सगळीकडे फक्त अलीशाचं नाव गाजत होतं. हे गाणं केवळ भारतातच नाही, तर परदेशातही खूप गाजलं. या गाण्याचे संगीतकार बिद्दू होते आणि हे गाणं मिलिंद सोमण यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं 90 च्या दशकातील सर्वाधिक हिट गाण्यांपैकी एक मानलं जातं आणि याच गाण्यानंतर अलीशा चिनॉय ‘क्वीन ऑफ इंडी पॉप’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
अनु मलिकवर लावलेला छळाचा आरोप
अलीशा चिनॉयचं व्यक्तिगत आयुष्यही बरंच वादग्रस्त आणि चढ-उताराने भरलेलं होतं. 1986 मध्ये तिने आपल्या मॅनेजर राजेश झवेरीशी लग्न केलं. पण 1994 मध्ये ते विभक्त झाले. 1995 मध्ये अलीशा आपल्या सुपरहिट गाण्यांसोबतच संगीतकार आणि गायक अनु मलिकवर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळेही चर्चेत आली होती. त्या प्रकरणानंतर दोघांनी बराच काळ एकत्र काम केलं नव्हतं. मात्र नंतर शाहीद कपूरच्या 'इश्क-विश्क' या चित्रपटासाठी दोघांना पुन्हा एकत्र काम करावं लागलं.
'ही' आहेत अलीशा चिनॉयची हिट गाणी
'काटे नहीं कटते' (1987), 'रुक रुक रुक' (1994), 'मेड इन इंडिया' (1995), 'आजा मेरे दिल में' (1995), 'कजरा रे' (2005) 'नो एंट्री' (2005), 'तिनका तिनका' 'दिल तू ही बता' (2013) ‘कजरा रे’साठी तिला 2006 मध्ये फिल्मफेअर बेस्ट प्लेबैक सिंगरचा पुरस्कारही मिळाला.