TRENDING:

Kojagiri Purnima 2025: यंदा 6 की 7 ऑक्टोबर नेमकी कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? शुभ मुहूर्त, पूजा-विधी आणि संपूर्ण माहिती, Video

Last Updated:

Kojagiri Purnima 2025: दरवर्षी अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या पौर्णिमेचे महत्त्व, पूजा-विधी आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दरवर्षी आश्विन महिन्यात येणारी कोजागिरी पौर्णिमा ही भारतीय संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची मानली जाते. यंदा ही पौर्णिमा 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता सुरू होऊन 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:18 वाजेपर्यंत राहणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि इतर राज्यांमध्ये हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
advertisement

या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ‘को जागर्ति?’ कोण जागं आहे? असा प्रश्न विचारते अशी श्रद्धा आहे. जो कोणी त्या रात्री जागृत राहतो, साधना करतो, त्याच्यावर लक्ष्मीमातेची विशेष कृपा होते. त्यामुळे या दिवशी भजन-कीर्तन, जागरण, लक्ष्मी पूजन आणि चंद्रप्रकाशात दूध प्राशन करण्याची परंपरा जपली जाते.

Kojagiri Purnima 2025: कोजागिरीला बनवा अमृतासारखं मसाले दूध, स्पेशल रेसिपी 5 मिनिटांत तयार, Video

advertisement

सुव्रत बेडेकर गुरुजी सांगतात, या रात्री लक्ष्मी पूजन करताना संकल्पपूर्वक पूजा करावी. घर स्वच्छ ठेवून रांगोळी काढावी. पश्चिमाभिमुख होऊन लक्ष्मीमातेची मूर्ती किंवा चित्रासमोर दीप लावावा. ‘श्रीसूक्त’ किंवा ‘लक्ष्मी अष्टोत्तर’ म्हणावे. दुधात केशर, साखर, वेलदोडा, सुकामेवा टाकून नैवेद्य दाखवावा आणि तो चंद्रप्रकाशात ठेवून नंतर सर्वांनी मिळून सेवन करावा.

या दिवशी आणखी एक खास प्रथा म्हणजे घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची ‘अश्विनी’ साजरी केली जाते. यामागचा हेतू म्हणजे त्या अपत्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं. धार्मिकदृष्ट्या ही रात्र धन, समृद्धी आणि आरोग्य प्राप्तीची संधी असते. सांस्कृतिक दृष्टिकोनातून ही एकत्रित आनंद साजरा करण्याची संधी असते. गुरुजी पुढे सांगतात, “ही रात्र फक्त पूजा करण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आत्मचिंतन, भक्ती आणि कुटुंबसमवेत वेळ घालवण्याची अमूल्य संधी आहे.”

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
सर्व पहा

यंदाची कोजागिरी पौर्णिमा सर्वांना भरभराट, शांती आणि समाधान घेऊन येवो, हीच मंगलकामना!

मराठी बातम्या/अध्यात्म/
Kojagiri Purnima 2025: यंदा 6 की 7 ऑक्टोबर नेमकी कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? शुभ मुहूर्त, पूजा-विधी आणि संपूर्ण माहिती, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल