Kojagiri Purnima 2025: कोजागिरीला बनवा अमृतासारखं मसाले दूध, स्पेशल रेसिपी 5 मिनिटांत तयार, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला घराघरात मसाले दूध बनवण्याची परंपरा आहे. अमृतासारखं मसाले दूध बनवण्याची रेसिपी जाणून घेऊ.
मुंबई: कोजागरी पौर्णिमा म्हटली की चंद्रप्रकाशात साजरा होणारा आनंद, देवी लक्ष्मीचं आवाहन आणि सोबत गरमागरम मसाला दुधाची गोड चव हा सगळ्यांचाच आवडता भाग. शरद ऋतूतील गारव्यात रात्री जागरण करत एकत्र जमलेली कुटुंबं, हास्यविनोद आणि केशरयुक्त मसाला दूध हे कोजागरीचं वैशिष्ट्य आहे.
घराघरात या खास रात्रीसाठी मसाला दूध बनवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही खास कोजागरीसाठी पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारं मसाला दूध कसं तयार करायचं, याची सविस्तर रेसिपी गृहिणी वैशाली कांबळे यांनी सांगितली आहे.
advertisement
मसाला दूध रेसिपी (2 जणांसाठी) आवश्यक साहित्य:
दूध – अर्धा लिटर, साखर – 2 चमचे (चवीनुसार), केशर – 8-10 काड्या, बदाम – 10-12, पिस्ता – 10-12 (चिरून), वेलदोडा पूड – अर्धा चमचा, जायफळ पूड – पाव चमचा
कृती:
- प्रथम दूध एका जाड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर गरम करत ठेवा.
- सगळे ड्रायफ्रूट्स पॅनमध्ये भाजून ते मिक्सरमध्ये वाटून घ्या, मग तो मसाला तयार होईल.
- दूध उकळायला लागल्यावर त्यात साखर घालून चांगलं मिसळा.
- वाटून घेतलेल्या ड्रायफ्रूट्स मसाला आणि वेलदोडा, जायफळ पूड त्यात टाका.
- दूध 10-15 मिनिटं उकळून थोडसं घट्ट होऊ द्या.
- वरून बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स वरून टाका.
- सर्व साहित्य एकजीव झाल्यावर गॅस बंद करा.
- गरमागरम किंवा किंचित थंड होऊ दिलेलं दूध सर्व्ह करा.
advertisement
कोजागरीचा आनंद द्विगुणित करा. ही रात्र देवी लक्ष्मीचं स्वागत करण्याची, चंद्रप्रकाशात कुटुंबासोबत क्षण जगण्याची आणि एकमेकांशी गोडवा वाढवण्याची असते. अशा गोड रात्रीत हे पारंपरिक मसाला दूध तुमच्या सणात चारचाँद लावेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 5:05 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Kojagiri Purnima 2025: कोजागिरीला बनवा अमृतासारखं मसाले दूध, स्पेशल रेसिपी 5 मिनिटांत तयार, Video