Diwali Recipe: दिवाळीत गोड-धोड खायला नको वाटतं? तर हा पारंपरिक पदार्थ ट्राय करा, बाकरवडीही फिकी!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Diwali Recipe: दिवाळी म्हटलं की गोड-धोड आणि वेगवेगळ्या पदार्थांचा बेत आलाच. बऱ्याचजणांना या काळात गोड-धोड खायचा कंटाळा येतो. तेव्हा बाकरवाडीपेक्षा भारी रेसिपी घरच्या घरी बनवू शकता.
जालना: दिवाळी आता जवळ येतीये. दिवाळीसाठी वेगवेगळे फराळाचे पदार्थ आपण नेहमीच बनवतो. परंतु, तेच तेच फराळाचे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे नाविन्यपूर्ण नवं असं काहीतरी खाण्याची इच्छा असते. तुम्ही देखील यापैकीच एक असाल तर अळूच्या पानांपासून झटपट आणि अत्यंत सोप्या पद्धतीने तयार होणारी आणि चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि कुरकुरीत असणारी अळूवडी ही रेसिपी तुम्ही घरीच ट्राय करू शकता.
अळूवडीसाठी साहित्य
चार ते पाच स्वच्छ धुतलेली अळूची पाने, दोन वाटी बेसन पीठ, तीन ते चार वाळलेल्या लाल मिरच्या, दोन ते तीन चमचे तीळ, एक चमचा जिरे, चवीनुसार हळद आणि मीठ, लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या, आदी साहित्याची आवश्यकता असेल.
advertisement
अळूवडी बनवण्याची कृती
सर्वप्रथम जिरे, हळद, मीठ, सोललेला लसूण आणि तीन ते चार लाल मिरच्या या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत. यानंतर दोन वाटी बेसन पिठामध्ये हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. यानंतर या मिश्रणामध्ये पाणी घालून पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं.
स्वच्छ धुतलेल्या अळूच्या पानावर हे मिश्रण व्यवस्थित लावायचं. दोन अळूची पाने एकमेकांवर विरुद्ध दिशेला ठेवून त्याची वळी तयार करून घ्यायची. याच पद्धतीने चार ते पाच वड्या तयार केल्यानंतर एका पातेल्यामध्ये गॅसवर मंद आचेवर ठेवून या वड्या वाफाळून घ्यायच्या. चार ते पाच मिनिटं गॅसवर मंद आचेवर वाफाळल्यानंतर या वड्यांना व्यवस्थित कट करून घ्यायचं.
advertisement
कट केलेल्या वड्यांना गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये तेल घालून आपल्या पद्धतीने खरपूस असं तळून घ्यायचं आणि प्लेटमध्ये आपल्या आप्तेष्टांना सर्व्ह करू शकता. अशा पद्धतीने अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशा अळूवड्या तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
October 05, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Diwali Recipe: दिवाळीत गोड-धोड खायला नको वाटतं? तर हा पारंपरिक पदार्थ ट्राय करा, बाकरवडीही फिकी!