Kohlacha Bond Recipe : फक्त 3 साहित्यात बनवा कोहळ्याचे बोंड, गरमागरम चव भारीच, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
कोहळ्याचे बोंड किंवा गुलगुले. अगदी तीन साहित्य वापरून हा पदार्थ तयार होतो.
अमरावती: आधीच्या काळात महिला प्रत्येक हंगामात वेगवेगळे पदार्थ बनवत होत्या. अगदी कमीतकमी साहित्यात चविष्ट असे पारंपरिक पदार्थ आधीच्या महिलांनी बनवलेत. जे आताही अनेकजण आवडीने बनवतात. त्यातीलच एक म्हणजे कोहळ्याचे बोंड किंवा गुलगुले. अगदी तीन साहित्य वापरून हा पदार्थ तयार होतो. त्याचबरोबर खाण्यासाठी देखील चविष्ट लागतो. पारंपरिक रेसिपी कोहळ्याचे बोंड कसे बनवायचे? त्याची रेसिपी जाणून घेऊया.
कोहळ्याचे बोंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य
शिजवून घेतलेलं कोहळ, गव्हाचे पीठ, मीठ, पिठीसाखर/गूळ आणि तळण्यासाठी तेल हे साहित्य लागेल.
कोहळ्याचे बोंड बनविण्याची कृती
सर्वात आधी कोहळ्याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याचे काप करून ते शिजवून घ्यायचे आहे. नंतर सर्वात आधी शिजवलेल्या कोहळ्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. पाणी काढून झाले की, कोहळ चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं. बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे.
advertisement
गव्हाचे पीठ हे अंदाजानुसार टाकायचे आहे. जास्त टाकून घ्यायचे नाही. भजे बनवण्यासाठी लागणाऱ्या मिश्रणाप्रमाणेच हे मिश्रण तयार करायचे आहे. नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्या. त्यानंतर लगेच पिठी साखर किंवा गूळ टाकून घ्यायचा आहे. साखर किंवा गूळ खूप जास्त टाकायचा नाही. अति गोड झाल्यास गुलगुले तेलात विरघळतात. त्यामुळं प्रमाणात साखर टाकून घ्यायची आहे. सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे.
advertisement
मिश्रण तयार झाल्यानंतर बोंड तळून घ्यायचे आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल जास्त गरम झालेलं लागेल. तेल गरम झालं की, बोंड टाकून घ्यायचे आहे. जशी आपण भजी बनवतो त्याचप्रमाणे हे बोंड करायचे आहे. तेलात व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. अशाप्रकारे बोंड तयार होईल. कोहळ्याचे बोंड तयार झाले की, गरमागरम हे बोंड तुम्ही खाऊ शकता. थंड झाल्यानंतर याच्या चवीमध्ये बदल पडतो त्यामुळे हे बोंड गरमागरम खाल्ली जातात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
October 04, 2025 3:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Kohlacha Bond Recipe : फक्त 3 साहित्यात बनवा कोहळ्याचे बोंड, गरमागरम चव भारीच, रेसिपीचा Video