'मिसेस देशपांडे' या सीरिजमधून अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आजवर कधीच न समोर आलेला अवतार पाहायला मिळणार आहे. नेहमीच रोमँटीक आणि ग्लॅमरस दिसणारी माधुरी याच एका वेगळ्या अंदाजात समोर येणार आहे. माधुरी स्वत: तिच्या या सीरिजसाठी उत्सुक आहे.
advertisement
ट्रेलमध्ये सहाव्या सेकंदापासूनच जबरदस्त थरार पाहायला मिळतोय. 'भोली सी सुरत आँखो में मस्ती' हे गाणं बोलत माधुरी एका माणसाचा दोरीनं गळा आवळते. माधुरी सीरिजमध्ये एक सीरियल किलर दाखवण्यात आली आहे. पोलीस माधुरीची चौकशी करतात. ती सांगते मी आत आहे म्हणजे बाहेर कोणीतरी माझी कॉरपी करत आहे. त्यानंतर माधुरी पोलिसांसोबत डील करते. तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे असं त्यांना सांगते. पण या मदतीत ती पोलिसांनी एक अट घालते. पोलीसही ती अट मान्य करतात आणि इथे मराठमोळ्या सिद्धार्थ चांदेकरची एन्ट्री होते. सिद्धार्थ चांदेकर या सीरिजमध्ये एक स्पेशल डिटेक्टिव्ह दाखवला आहे. आता त्याचं माधुरीशी काय कनेक्शन आहे हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
माधुरीच्या 'मिसेस देशपांडे'चा ट्रेलर पाहून चाहत्यांनी सीरिज पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. एकाने लिहिलंय, 'माधुरी दीक्षितला असं कधीच पाहिलेलं नाही'. दुसऱ्यानं लिहिलंय, 'क्विन पुन्हा स्क्रिनवर राज्य करण्यासाठी येतेय.' आणखी एका युझरनं लिहिलंय, 'हा शो कमाल होणार आहे. माधुरी दीक्षित नेहमीच चमकते. ती सुपरस्टार अभिनेत्री आहे'.
माधुरीची 'मिसेस देशपांडे' ही सीरिज 19 डिसेंबर 2025 रोजी जिओहॉटस्टारवर रिलीज होणार आहे. माधुरीचं हे मल्टिलेअर कॅरेक्टर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
