'सन ऑफ सरदार 2' मध्ये अॅक्शन, भावना, विनोद आणि उत्तम प्रकारे मांडलेली कथा पाहायला मिळते. 'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे.
कोणत्या ओटीटीवर पाहाल?
'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर जबरदस्त एन्ट्री केली आणि पाहता पाहता तो नंबर 1 वर ट्रेंड होऊ लागला आहे. या चित्रपटाने सुपरहिट 'सैयारा' आणि 'महावतार नरसिन्ह' या चित्रपटांना मागे टाकत उच्च स्थान पटकावलं आहे. अजय देवगण यांच्या या चित्रपटासमोर इतर कोणत्याही शो किंवा चित्रपटाला टिकण्याची संधी मिळाली नाही. या चित्रपटाने केवळ ट्रेंडिंग लिस्टमध्ये आपले स्थान मिळवले नाही, तर थेट नंबर 1 वर कब्जा केला आहे. 'सैयारा' आणि 'महावतार नरसिंह' यांनी सिनेमागृहांमध्ये आणि ओटीटीवर जबरदस्त कामगिरी केली होती, पण अजय देवगण यांच्या या चित्रपटासमोर मात्र हे बहुचर्चित चित्रपट टिकू शकले नाहीत. 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटातील विनोदी संवाद प्रेक्षकांना चांगलच हसवतात.
advertisement
Upcoming Movies : ऑक्टोबरमध्ये धमाका! 1-2 नव्हे तर तब्बल 10 चित्रपट होणार रिलीज, ते कोणते?
'सन ऑफ सरदार 2'चा ओटीटीवर धमाका
'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटातील शानदार डायलॉग्स आणि विनोदी कथानक प्रेक्षकांना खूपच भावत आहे. त्यामुळे सिनेप्रेमी पुन्हा-पुन्हा हा चित्रपट पाहत आहेत. याच कारणामुळे या चित्रपटाची स्ट्रीमिंग रेटिंग सतत उच्च पातळीवर आहे. त्यामुळे आता हा चित्रपट ओटीटीवर किती काळपर्यंत आपली जादू टिकवून ठेवतो हे पाहावे लागेल. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला होता. त्यामुळे आता ओटीटीवर हा चित्रपट किती तग धरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
'महावतार नरसिम्हा' ओटीटीवर पडला मागे
'महावतार नरसिम्हा' या चित्रपटाने जगभरात 300 कोटींची कमाई केली होती. अश्विन कुमार दिग्दर्शित या पौराणिक चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा झाली. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर अखेर हा चित्रपट 19 सप्टेंबरला ओटीटीवर प्रदर्शित झाला. पण ओटीटीवर आपलं अधिराज्य गाजवण्यात 15 कोटींची निर्मिती असणारा हा चित्रपट कमी पडला.