छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा येथील भगवान पवार यांनी तीन एकर वर मोसंबीची बाग लावली. यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. फळबागेला पैसे लावताना कर्ज काढलं होतं. कष्टाने वाढवलेल्या मोसंबी बागेतून 15 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. पावसामुळे झालेल्या नुकसानीत 50 हजार रुपयांचं देखील उत्पन्न मिळणं कठीण झालं आहे. मोसंबी बागेवर रोग पडल्याने संपूर्ण बाग मशीन ने कापून टाकली आहे.
advertisement
Marathwada Weather : मराठवाड्यासाठी दिलासा, पावसाचा जोर कमी होणार, हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट
या बागेला स्वतःच्या लेकराप्रमाणे जपलं होतं. सर्व काळजी घेतली होती. पण मुसळधार पाऊस झाला आणि सध्याला मोसंबीला रोग पडला आहे. बँकेचे कर्ज काढलेलं आहे. आता कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न आहे. दररोज बँकेचे फोन येतात. त्यामुळे आम्ही ही बाग तोडण्याचा निर्णय घेतला. सरकारने शेतकऱ्यांचे संकट बघून तात्काळ कर्जमाफी करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी भगवान पवार यांनी केली आहे.
आमच्या मोसंबीला भाव नाही आहे. यासाठी माझ्या भावाने कर्ज काढले होते. सकाळी उठल्यापासून बँकेचा फोन येतो, नोटीस येतात. तुम्ही कर्ज का भरत नाही, तुमच्याकडे फळबाग आहे. त्यामुळे ही बाग तोडायचा निर्णय घेतलेला आहे, असं कृष्णा पवार म्हणाले आहेत.