Agriculture News : आता कर्ज कसं फेडायचं? पावसामुळे मोसंबीवर रोग, शेतकऱ्यावर 3 एकर बाग तोडण्याची वेळ
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाड्यावर अस्मानी संकट आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा तोडल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यावर अस्मानी संकट आले आहे. मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला यामुळे अनेक शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा तोडल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा येथील भगवान पवार यांनी तीन एकर वर मोसंबीची बाग लावली. यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. फळबागेला पैसे लावताना कर्ज काढलं होतं. कष्टाने वाढवलेल्या मोसंबी बागेतून 15 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. पावसामुळे झालेल्या नुकसानीत 50 हजार रुपयांचं देखील उत्पन्न मिळणं कठीण झालं आहे. मोसंबी बागेवर रोग पडल्याने संपूर्ण बाग मशीन ने कापून टाकली आहे.
advertisement
या बागेला स्वतःच्या लेकराप्रमाणे जपलं होतं. सर्व काळजी घेतली होती. पण मुसळधार पाऊस झाला आणि सध्याला मोसंबीला रोग पडला आहे. बँकेचे कर्ज काढलेलं आहे. आता कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न आहे. दररोज बँकेचे फोन येतात. त्यामुळे आम्ही ही बाग तोडण्याचा निर्णय घेतला. सरकारने शेतकऱ्यांचे संकट बघून तात्काळ कर्जमाफी करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी भगवान पवार यांनी केली आहे.
advertisement
आमच्या मोसंबीला भाव नाही आहे. यासाठी माझ्या भावाने कर्ज काढले होते. सकाळी उठल्यापासून बँकेचा फोन येतो, नोटीस येतात. तुम्ही कर्ज का भरत नाही, तुमच्याकडे फळबाग आहे. त्यामुळे ही बाग तोडायचा निर्णय घेतलेला आहे, असं कृष्णा पवार म्हणाले आहेत.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
September 29, 2025 9:52 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : आता कर्ज कसं फेडायचं? पावसामुळे मोसंबीवर रोग, शेतकऱ्यावर 3 एकर बाग तोडण्याची वेळ