महिमाचा जन्म 13 सप्टेंबर 1973 साली पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग शहरात झाला. गावातच तिचं हायस्कुलपर्यंतचं शिक्षण झालं.
1990 साली तिनं शिक्षण सोडून मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचं ठरवलं. या काळात तिनं ऐश्वर्याबरोबर काही जाहिरातीत काम केलं.
advertisement
तिने एका म्युझिक चॅनेलमध्ये व्हिडीओ जॉकी म्हणूनही काम केलं आहे. 1997 साली रिलीज झालेल्या परदेस सिनेमातून तिनं डेब्यू केला. परदेस बॉक्स ऑफिसवर हिट झाला. या सिनेमासाठी महिमाला बेस्ट फिमेल डेब्यू फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
advertisement
त्यानंतर महिमाने 'धडकन', 'दिल है तुम्हारा', 'लज्जा' और 'बागवान' सारख्या अनेक हिट सिनेमात काम केलं. या वर्षात महिमाचं करिअर पिकवर होतं आणि तिच्या करिअरला ब्रेक बसला.
advertisement
एक दिवस महिला स्वत: ड्राइव्ह करत सेटवर चालली होती. तेव्हा समोरून ट्रक आला आणि तिचा अपघात झाला. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. जवळपास 67काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यात घुसले.
advertisement
या अपघातानंतर ती अनेक वर्ष इंडस्ट्रीपासून दूर होती. तिला मिळणारी काम देखील कमी झाली. तिनं 2007 साली बिझनेसमन बॉबी मुखर्जीबरोबर तिनं लग्न केलं. पण दोघांचं लग्न फारकाळ टिकलं नाही. 2013 साली तिचं लग्न मोडलं.
महिमा बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री जिनं कॅन्सरवर मात केली आहे. 2023मध्ये तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. ट्रिटमेंट दरम्यान तिला झालेल्या त्रासाचा तिला काही महिन्यांना खुलासा केला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 13, 2024 6:01 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
करिअर पिकवर असताना कार अपघात,दिली कॅन्सरशी झुंज,अभिनेत्रीच्या आयुष्यातील संघर्ष संपेना
