TRENDING:

Priya Passed Away : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीनं प्रेग्नन्सीत गमावला जीव; बाळाला न पाहताच घेतला अखेरचा श्वास

Last Updated:

दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं आहे. डॉ. प्रिया असं अभिनेत्रीचं नाव असून तिच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रिया 8 महिन्यांची गरोदर होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 01 नोव्हेंबर :  दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं आहे. डॉ. प्रिया असं अभिनेत्रीचं नाव असून तिच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रिया 8 महिन्यांची गरोदर होती. प्रेग्नन्सीतच हृदयविकाराच्या झटक्याने प्रियाचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती डॉक्टरही होती.
प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन
प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन
advertisement

साऊथ टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत प्रियाचे नाव डॉ. डॉ.प्रिया यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रिया 8 महिन्यांची गर्भवती होती. मल्याळम टीव्ही अभिनेत्री डॉ.प्रियाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर दक्षिणेतील अभिनेते किशोर सत्या यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर दिली आहे. सत्याने लिहिलं आहे की, "आमची लाडकी अभिनेत्री डॉ. प्रिया, जी 8 महिन्यांची गरोदर होती, ती आता या जगात नाही. हृदयविकाराच्या झटक्याने प्रियाचा मृत्यू झाला आहे.'' अभिनेत्रीच्या आकस्मिक मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांची अवस्था खुपच वाईट झाली आहे.

advertisement

'या' चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार प्रियांका चोप्रा; हृतिक रोशनसोबत झळकणार देसी गर्ल?

प्रियाचं निधन झालं असलं तरी तिचं मूल मात्र वाचलं आहे. तिच्या लहान बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिचे पती नन्ना हे सध्या खूप दु:खात बुडालेले आहेत. प्रियाच्या अशा जाण्याने टीव्ही जगताचे मोठे नुकसान झालं असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. प्रियाला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. चाहत्यांना अजूनही डॉ. प्रियाच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

अभिनेत्री म्हणून डॉ.प्रिया यांनी मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली होती. छोट्या पडद्यावरील चमकदार अभिनेत्रींमध्ये प्रियाचे नाव नेहमीच आघाडीवर असायचे. 'करुथमुथु' या टीव्ही मालिकेत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने डॉ. प्रियाने चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली. अभिनेत्री असण्यासोबतच ती डॉक्टरही होती. अभिनेत्रीच्या मृत्यूने मल्याळम टीव्ही जगताला मोठा धक्का बसला आहे. मोठी गोष्ट म्हणजे वयाच्या 35 व्या वर्षी प्रियाचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Priya Passed Away : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीनं प्रेग्नन्सीत गमावला जीव; बाळाला न पाहताच घेतला अखेरचा श्वास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल